Aurangabad Crime : वर्षभरापूर्वी चोरलेली एक लाखाची मोटरसायकल, रेकाॅर्डवरील चोरटा जेरबंद

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – रिलायन्स माॅल च्या पार्किंग मधून वर्षभरापूर्वी रेकाॅर्डवरील चोरट्याने एक लाख रु.किमतीची महागडी मोटरसायकल पळवली होती. मुद्देमालासह पुंडलिकनगर पोलिसांनी खुल्ताबाद परिसरातून आणली.

Advertisements

अनिल उत्तम पवार (अंदाजे ३०) रा. पळसवाडी ता. खुल्ताबाद असे रैकाॅर्डवरील चोरट्याचे नाव आहे. एपीआय घन्न:शाम सोनवणे यांना खबर्‍याने रिलायन्स माॅल मधून चोरलेल्या मोटरसायकलची माहिती सांगताच पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपी अनिल पवार ला पळसवाडीहून मोटरसायकलसहित ताब्यात घेतले.पवार ने गुन्ह्याची कबुली दिली.

Advertisements
Advertisements

बीडबायपास वरील देवळाई रोडवर गंगोत्री रेसीडेन्स येथे राहणार्‍या संपत हिरामण राठोड(४०) धंदा शेती यांची मोटरसायकल असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले. १८ आॅगस्ट २०१८ रोजी रिलायन्स माॅल मधे सकाळी ११वा.राठोड खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची मोटरसायकल माॅलच्या पार्किंग मधे लावली होती. खरेदी आटोपून घरी निघण्यासाठी राठोड पार्किंग मधे गेले असता मोटरसायकल दिसली नाही.म्हणून राठोड यांनी पुंडलिकनगर पोलिसांकडे तक्रार दिली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी रविवारी तो गुन्हा उघडकीस आणला पुढील तपास एपीआय सोनवणे करंत आहेत

आपलं सरकार