Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मोदींचा रोख राष्ट्रीय मुद्यांवर , पहिल्याच प्रचार सभेत विरोधकांना आव्हान , घेतलेले निर्णय बदलून दाखवा

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावमध्ये पहिली प्रचारसभा घेत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुकले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मोदी म्हणाले, “देशातील काही राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जम्मू काश्मीरच्या मुद्यावरून राजकारण करत आहे. मी विरोधकांना आव्हान देतो. मैदानात या. तुमच्यात हिंमत असेल तर कलम ३७०, ३५ए आणि तिहेरी तलाक निर्णय बदलण्याची जाहिरनाम्यात घोषणा करा,” असं आव्हान मोदी यांनी विरोधकांना दिलं.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण तापले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावमध्ये सभा झाली. यावेळी मोदी म्हणाले, “गेल्या ७० वर्षांपासून जम्मू काश्मीरातील वाल्मिकी बंधूना जगण्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवलं गेलं. जम्मू काश्मीर आणि लडाख भारताचं शिर आहे. तिथलं संपूर्ण जीवन भारताला मजबूत बनवण्याचं काम करते. त्यामुळे आम्ही संर्पूण सावधगिरी बाळगत आम्ही ५ ऑगस्टला कलम ३७० आणि ३५ए रद्द करण्याचा निर्णय घेतला. चाळीस वर्षांपासून तिथं अशांतता होती. मी वचन देतो चार महिन्यात काश्मीरातील पूर्वपदावर आणणार,” असं मोदी म्हणाले.

कलम ३७० आणि तिहेरी तलाकवरून मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसवर शिरसंधान केलं. मोदी म्हणाले,”देशातील काही राजकीय पक्ष आणि राजकीय पक्ष राष्ट्रहितासाठी घेतलेल्या या निर्णयाचं राजकारण करत आहे. हे पक्ष महाराष्ट्रात मत मागण्यासाठी येत असून, त्यांच्या मुलाखती बघा. त्यांची भूमिका शेजारी देशाच्या भाषेसारखी आहे. जम्मू काश्मीर विषयी देश जो विचार करतो. त्याच्या उलट विरोधक विचार करतात. देशाच्या भावनेसोबत उभं राहण्यात त्यांना संकोच वाटत आहे. मी तुम्हाला वचन देतो. जम्मू काश्मीरला पूर्वपदावर आणण्यासाठी कटिबद्ध आहे,” असं सागतानाच मोदी म्हणाले,”आज मी विरोधकांना आव्हान देतो. कान उघडे ठेवून ऐका. जर तुमच्यात हिंमत आहे तर या निवडणुकीत आणि येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या जाहिरनाम्यात कलम ३७० आणि ३५ए पुन्हा लागू करण्याची ही घोषणा करा. ५ ऑगस्टला घेतलेला निर्णय आम्ही बदलू असं सांगा. नाहीतर हे अश्रू गाळणं थांबवा,” असं आव्हान मोदी यांनी दिलं.

“भाजपाने तिहेरी तलाक हटवण्याचं मुस्लिम माता भगिनींना वचन दिलं होतं. पुन्हा सत्तेत आल्यानंतर आम्ही तिहेरी तलाक रद्द केलं आणि वचन पूर्ण केलं. यातही काँग्रेस आणि विरोधकांनी अडथळे आणले. मी यात निर्णयातबद्दलही विरोधकांना आव्हान देतो की, तुमच्यात हिंमत असेल तर तिहेरी तलाक पुन्हा आणू अशी घोषणा करावी. मुस्लिम पुरूष फक्त पती नाही. तर तो बाप आहे, मुलगा आहे, भाऊ आहे. पतीच्या नात्यातून त्याला बरोबर वाटत नाही. पण बाप आणि भावाच्या भूमिकेतून बरोबर आहे हे त्यांना पटलंय,” असंही मोदी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!