Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : परळीत मोदीच काय भाजपने डोनाल्ड ट्रम्प जरी आणले तरी विजय माझाच : धनंजय मुंडे

Spread the love

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परळी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येत आहेत. तेच काय पण भाजपाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी आणले, तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. परळी मतदार संघातील घाटनांदूर येथील प्रचार सभेत मुंडे बोलत होते.

विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाची असलेल्या परळी मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्हीही पक्षांनी परळीची लढत प्रतिष्ठेची केली आहे.

नेहमीप्रमाणे परळी मतदारसंघात ‘काटे की टक्कर’ बघायला मिळत आहे. निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दोन्ही नेते एकही संधी सोडत नाहीत. महिला व बालकल्याण मंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी १७ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचार सभा होणार होत. यावरून धनंजय मुंडे यांनी काहीही फरक पडणार नसल्याचे म्हटलं आहे. ते म्हणाले, “भाजपा पराभवाच्या भीतीने मोठ-मोठे नेते आणत आहे. पण भारतातील नेत्यांबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी परळीत सभेला आले तरी माझा विजय निश्चित आहे,” असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच परळी मतदारसंघात भाजपाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जी रॅली पहिली त्याचा धसका घेतला म्हणून बड्या नेत्यांना येऊन प्रचारासाठी येत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या माळी-धनगर-वंजारी या समीकरणातील सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे पंकजा मुंडेंना मोठा धक्का समजला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपासोबत असलेले कल्याणराव आखाडे लोकसभा निवडणुकीपासून नाराज होते. भाजपसोबत एकनिष्ठ काम करून सत्तेत वाटा दिला नाही, वारंवार डावलले गेले. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वावर नाराज होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात ओबीसी मतांचा फटका बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!