Aurangabad Crime : चोवीस तासात दुचाकी चोर अटकेत 

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : सातारा परिसरातील कामगाराची दुचाकी वॉचमनला नातेवाईक असल्याचे सांगून लांबविणा-या चोराला सातारा पोलिसांनी सीसी टिव्ही फुटेजच्या आधारे चोवीस तासातच अटक केली आहे. मनोज मगन दाभाडे (२३, रा. राहुलनगर, महानगर पालिका शाळेजवळ) असे दुचाकी चोराचे नाव आहे.

Advertisements

सुनील गणपत नाईक (५३, रा. सुयोग कॉलनी, परिवार अपार्टमेंट, पदमपुरा) यांना दैनंदिन कामासाठी जालना येथे जायचे असल्याने त्यांनी सातारा परिसरातील तिरुपती सुप्रीम एन्क्लीव्ह येथे दुचाकी (एमएच-२०-एआर-५१२६) उभी केली होती. या दुचाकीबाबत त्यांनी अपार्टमेंटमधील वॉचमनला सांगितले होते. मात्र, अपार्टमेंटमध्ये शिरलेल्या दाभाडे याने आपण नाईक यांचे नातेवाईक आहोत असे सांगत बनावट चावीच्या सहाय्याने त्यांची दुचाकी १० आॅक्टोबर रोजी सकाळी सव्वासहा ते दुपारी साडेबाराच्या सुमारास लांबविली.

Advertisements
Advertisements

दुचाकी चोरीला गेल्याचे समजताच नाईक यांनी १२ आॅक्टोबर रोजी सातारा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली होती. त्यावरुन सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे, उपनिरीक्षक अनिता फसाटे आणि सहायक फौजदार ससाणे यांनी अपार्टमेंटमधील सीसी टिव्ही फुटेज हस्तगत केले. त्याआधारे शोध घेऊन चोवीस तासात दुचाकी चोर मनोज दाभाडे याला अटक केली. त्याच्याकडून नाईक यांची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

आपलं सरकार