Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : भावी इंजिनिअरला साडेसहालाखांना गंडा, रक्कम परत मिळविण्यासाठी पोलिसांची प्रयत्नांची पराकाष्टा

Spread the love

औरंगाबाद – गेल्या जून महिन्यात बॅंकेतून बोलंत असल्याचे भासवून गारखेडा परिसरात राहणार्‍या भावी इंजिनिअरला भामट्यांनी ६लाख ६० हजारांना गंडा घातला.या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यापूर्वी कायदेशीर मार्गाने फिर्यादीला पैसे परंत मिळण्याकरता पोलिसांनी अथक परिश्रम घेतले.शेवटी चार महिन्यानंतर शनिवारी रात्री सायबर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
अक्षय संतोष काथार(२१) रा. न्यू गजानन काॅलनी गारखेडा औरंगाबाद या भावी इंजिनिअरला गेल्या १९ जून रोजी इंडीयन ओव्हरसीज बॅंकेकडून फोन आला होता.भामट्याने बोलतांना असे सांगितले की, अक्षय याचे नाव एटीएम कार्डवर नसल्यामुळे एटीएम बदलून घ्यावे लागेल.व त्वरीत एक ओटीपी मेसेज पाठवून अक्षय काथार च्या कार्ड चे डिटेल मिळवले.व १९ ते २५ जून या काळात ६लाख ५९ हजार ८८३ रु. आॅनलाईन वळवून घेतले. हा गारखेडा येथील रिलायन्स माॅलमधे अक्षय काथार खरेदी साठी गेले असता वरील प्रकार उघडकीस आला.सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी तक्रार प्राप्त होताच आकाशवाणी परिसरातील इंडीयन ओव्हरसीज बॅंकेशी पत्रव्यवहार करुन काथार यांचे हडपलेले पैसे परत मिळू शकतात का ? या दृष्टीने प्रयत्न केले. पण भामट्याने आॅनलाईन पैसे वळवताना अनेक खात्यांचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघंड झाले.

या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास देशमाने करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!