Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : एटीएम कार्डची अदलाबदली , वृध्दाच्या खात्यातून २८ हजार पाचशे लंपास 

Spread the love

वृध्दांना टार्गेट करुन एटीएम कार्डची अदलाबदली करत भामट्यांनी एटीएम मशीनमधून पैसे काढत अनेकांची फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. यापुर्वी देखील बरेचसे प्रकार घडले असून, या भामट्यांचा पोलिसांना सुगावा लागलेला नाही. अशीच घटना ११ आॅक्टोबर रोजी भरदुपारी साडेबाराच्या सुमारास सिडको, एन-५ मधील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये घडली. यावेळी भामट्याने वृध्दाच्या खात्यातून २८ हजार पाचशे रुपये लांबविले.

सेवानिवृत्त असलेले मुकुंद गोविंदराव कुलकर्णी (६९, रा. कासलीवाल पुर्वा, चिकलठाणा विमानतळाजवळ, जालना रोड) हे दुपारी साडेबाराच्या सुमारास पत्नी सुवर्णा यांच्या नावे असलेल्या बचत खात्यातील रक्कम डेबिट कार्डने काढण्यासाठी सिडको, एन-५ मधील बँकेत गेले होते. विम्याचा हप्ता भरायचा असल्याने बँकेच्या शेजारी असलेल्या एटीएम सेंटरमध्ये ते पैसे काढण्यासाठी गेले. तेव्हा तेथे असलेल्या एका भामट्याने त्यांना काका तुम्हाला पैसे काढायचे जमत नसल्यास मी तुम्हाला मिनी स्टेटमेंट काढून देतो असे म्हणाला. त्याच्यावर कुलकर्णी यांनी विश्वास ठेवत एटीएम दिले.

याचीच संधी साधून चोराने एटीएम कार्डचा गोपनीय क्रमांक घेतल्यावर कार्डची अदलाबदली केली. त्यानंतर कुलकर्णी यांच्या पत्नीच्या खात्यात असलेले २८ हजार पाचशे रुपये काढून घेतले. एटीएमची अदलाबदली झाल्याचे लक्षात आल्यावर कुलकर्णी यांनी १२ आॅक्टोबर रोजी दुपारी सिडको पोलिस ठाणे गाठत भामट्याविरुध्द तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!