मोहन भागवत यांच्या वक्तव्याला खा. असदुद्दीन ओवैसी यांनी दिले हे उत्तर…

Advertisements
Advertisements
Spread the love

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करून संघाचे सरसंघचालक मोहन भागवत  यांच्या ” भारत हे हिंदू राष्ट्र आहे.”  या वक्तव्याचे उत्तर देताना ओवेसी यांनी म्हटले आहे कि, भागवत हे हिंदू नाव देऊन आमचा इतिहास मिटवू शकत नाहीत. आमची संस्कृती, श्रद्धा, पंथ आणि व्यक्तिगत ओळख ही फक्त हिंदू धर्माशी संबंधीत नाही आणि असणारही नाही असंही ते म्हणाले. भारत कधीही हिंदू राष्ट्र नव्हते, नाही आणि असणारही नाही, इंशाअल्लाह असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. ओवेसींच्या या वक्तव्यावरून आता निवडणुकीच्या प्रचारात वाद होण्याची शक्यता आहे.

Advertisements

नागपूर इथं झालेल्या संघाच्या विजयादशमी मेळाव्यात भागवत यांनी हिंदू हे कुठल्याही एका पूजापद्धतीशी, पंथाशी किंवा धर्माशी संबंधीत नाही तर ती एक जीवनपद्धती आहे. भारतात जे राहतात ते सर्व हिंदू आहेत आणि त्यांचं सांस्कृतिक नातं हे हिंदू धर्माशी संबंधीत आहे असं म्हटलं होतं.  याच मुद्यावर भर दिला होता.

Advertisements
Advertisements

नेहमीच संघ कायम हाच मुद्दा ठसविण्याचा प्रयत्न कायम करत असतो. भारत हे हिंदू राष्ट्र होतं, आहे आणि राहिल असं भागवत कायम सांगत असतात. तोच धागा पकडत त्यांनी ही भावना देशात रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. ओवेसी यांनीही कायम याच मुद्यावर आक्षेप घेतला असून संघ हा एक संस्कृती आणि धर्म लादण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप केलाय. भारत हा विविध धर्म आणि पंथ, भाषा, संस्कृती आणि खान पान यांचा देश असून तिथे फक्त एकच धर्म लादला जावू शकत नाही असे प्रत्युत्तर ओवेसी यांनी दिले आहे.

आपलं सरकार