Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जेलवारी केलेले गुजरातचे एक भले मोठे ज्यांच्या नावात सतत माझे नाव असते , याची गम्मत वाटते : शरद पवार

Spread the love

भाजपसमोर महाराष्ट्राची सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान तर आहेच शिवाय शरद पवारच्या पश्चिम महाराष्ट्र सुरुंग लावण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून पुणे, सातारा, सांगली , कोल्हापुरात आपला करिष्मा अजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहांच्या या प्रयत्नांना शह देण्यासाठी पवार अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करीत आहेत. आजही पवारांनी अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला . हा विषय लावून धरताना पवार म्हणाले कि , “निवडणुकांच्या प्रचाराचा पारा चढू लागला आहे. गुजरातचे एक भले मोठे गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नसतानाही त्यांच्या तोंडात सतत माझेच नाव आहे,” अशी टीका पवार यांनी शाह यांच्यावर केली.

विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून कलम ३७०चा वारंवार पुर्नउल्लेख केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शरद पवार हे कलम ३७०च्या विरोधात असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे त्यांच्या सभेत यावरून शरद पवारांवर टीका करत असून, त्याला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. शिरूर येथे झालेल्या प्रचार सभेत शरद पवार म्हणाले,”हे गृहस्थ मला विचारतात ३७० वर उत्तर द्या. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. सभागृहात माझ्याबद्दल काही नोंद आहे का? मी काही गोंधळ केला का? मग जाब कसला विचारता? यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून कलम ३७०चा मुद्दा पुढे केला जात आहे,” असं पवार यांनी सांगितलं.

शाह यांना उत्तर देताना पवार म्हणाले,”निवडणुकांच्या प्रचाराचा पारा चढू लागला आहे. गुजरातचे एक भले ‘मोठे’ गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नसतानाही त्यांच्या तोंडात सतत माझेच नाव… निवडणूक शरद पवार या एका नावावरच ते लढवत आहेत,”असा टोला पवार यांनी लगावला.

“गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात सांगतात की, आता काश्मीरमध्ये शेती करणे शक्य आहे. मला सांगा इथलं घरदार सोडून काश्मीरात कोण जाणार आहे का शेती करायला? हे मुद्द्याचे बोलतच नाहीत.. महागाईवर बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला, आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला की..,” असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपा-शिवसेनेत गेलेल्या नेत्यांवर शरद पवार यांनी निशाणा साधला. “अनेक जण आज पक्ष सोडून जात आहेत. पक्षात रहायचे की नाही हे ज्याचे त्याचे मत आहे. सोबत आले तर बरं.. नाही आले तर दुखवट्याचा ठराव मांडून पुढे जायचं…,”असं पवार म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!