Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nobel 2019 : इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेचे नोबेल

Spread the love

नोबेल पुरस्कार विजेत्या प्रत्येकाला जवळपास साडे चार कोटी रुपये रोख रुपये दिले जातात. तसेच २३ कॅरेट सोन्याचा २०० ग्रॅमचे पदक आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. पदक म्हणून नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांचा फोटो असलेले सोन्याचे पदक दिले जाते. या पदकावर त्यांचा जन्म आणि मृत्यू अशी तारीख असते. तर पदकाच्या दुसऱ्या बाजुला युनानी देवी आयसिसचे चित्र, रॉयल अकादमी ऑफ सायन्स स्टॉकहोम पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीची माहिती दिलेली असते.


इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना २०१९ च्या शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. शत्रू देश असलेल्या इरिट्रिया यांच्यासोबत शांतता प्रस्तापित केल्याने अबी अहमद यांना शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आल्याची माहिती पारितोषिक निवड समितीने दिली आहे. २०१८ साली पंतप्रधान बनल्यानंतर अबी अहमद यांनी इथियोपियामध्ये मोठ्या प्रमाणात उदारीकरणाला सुरुवात केली आहे. त्यांनी हजारो विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची कारागृहातून मुक्तता करण्याचे आदेश दिले. तसेच निर्वासित असलेल्या असंतुष्टांना देशात परत येण्याची परवानगी दिली. त्यामुळेच अबी अहमद यांना शांततेचा नोबेल जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात आधी त्यांनी आपले कट्टर शत्रू राष्ट्र एरिट्रियासोबत यशस्वीरित्या शांतता करार केला. नुकतेच घेतलेल्या त्यांच्या या निर्णयाचे आणि सीमाप्रश्न सोडवण्याच्या शांततापूर्वक प्रक्रियेचे जगभरात कौतुक करण्यात आले. शांततेचा नोबेल मिळवण्यासाठी जगभरातून एकूणच ३०१ उमेदवारांचे अर्ज आले होते. या अर्जामध्ये २२३ व्यक्ती आणि ७८ संघटनांचा समावेश होता. परंतु, निवड समितीने अबी अहमद यांच्या नावाला पसंती देत त्यांना २०१९ चा शांततेचा नोबेल दिला आहे.

पोलंडची लेखिका ओल्गा टोकरझुक यांना २०१८ साठीचे साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे तर २०१९ च्या साहित्याच्या नोबेलसाठी ऑस्ट्रियाचे कादंबरीकार व नाटककार पीटर हँडकी यांची निवड करण्यात आली आहे. अमेरिकेचे शास्त्रज्ञ जॉन बी. गुडइनफ, ब्रिटनचे स्टॅनली व्हिटिंघम आणि जपानचे शास्त्रज्ञ अकिरा योशिनो या तीन शास्त्रज्ञांना आयन बॅटरीच्या संशोधनासाठी रसायन विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!