Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पश्चिम बंगाल : गरोदर पत्नी , पती आणि बालकाची क्रूर हत्या

Spread the love

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून तीन जणांची निर्घृणपणे हत्या केली आहे. यात एका शिक्षकासह त्यांची गर्भवती पत्नी आणि त्यांच्या ८ वर्षीय मुलाचा समावेश आहे. या तिघांचीही धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुर्शिदाबादमधील जियागंड परिसरात राहणाऱ्या व शिक्षक असलेल्या या कुटुंबाची हत्या करण्यात अनेकांना धक्का बसला आहे. मृत व्यक्तीमध्ये बंधू प्रकाश पाल (वय ३५), त्यांची पत्नी ब्युटी मोंडल पाल (वय ३०) आणि त्यांचा मुलगा अंगन बंधू पाल (वय ८) या तिघांचा समावेश आहे.

शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या घराचा दरवाजा उघडल्यानंतर हे तिघेही रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडल्याचे त्या व्यक्तीला दिसले. त्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. बंधू प्रकाश पाल हे गोसाईग्राम या ठिकाणी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. तर त्यांची पत्नी ही गर्भवती होती, तरीही हल्लेखोरांनी तिची निर्घृणपणे हत्या केली. तसेच त्यांच्या ८ वर्षाच्या मुलाचीही हत्या केली. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान बंधू प्रकाश हे शिक्षक असले तरी तो आमचा कार्यकर्ता होता. तसेच त्याने नुकताच साप्ताहिक मिलनमध्ये सहभाग नोंदवला होता, असा दावा पश्चिम बंगालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते जिष्णू बसू यांनी केला आहे. मृत बंधू प्रकाश पाल हे शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. ते मूळचे शाहपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ते मुर्शिदाबादला शिफ्ट झाले होते, त्यांचा कोणासोबत वाद होता की नाही याबाबत आम्हाला काही माहिती नाही, अशी माहिती मृतक शिक्षकांचे भाऊ सुजॉय घोष यांनी पोलिसांना दिली आहे.

या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शिक्षकाची हत्या करण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांनी दरवाजा उघडल्यानंतर ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!