Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Vidhansabha 2019 : “वंचित” च्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयावर आयकर खात्याचा छापा….

Spread the love

स्वबळावर २८८ जागा लढविण्याच्या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचा खर्च नेमका कसा चालतो? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात असताना आयकर विभागाने आज वंचित बहुजन आघाडीचे चांदिवली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या कार्यालयावर अचानक छापा मारून आर्थिक स्थितीची तपासणी केली. मात्र अधिकाऱ्यांच्या हाती केवळ ११०० रुपयांची रक्कम लागली. त्यामुळे आयकर खात्याची अवस्था डोंगर पोखरून उंदीर काढावा अशी झाली असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या या उमेदवाराच्या साकीनाका येथील कार्यालयावर आयकर अधिकाऱ्यांनी दिवसभर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची झाडा-झडती घेतली आणि केवळ सुद्बुद्धीतून आमच्यावर कारवाई केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.

वास्तविक वंचित बहुजन आघडीच्या आर्थिक स्थिती बाबत जेंव्हा जेंव्हा प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला तेंव्हा तेंव्हा त्यांनी जनतेकडून आम्हाला देण्यात येणाऱ्या लहान लहान देण्ग्यावर आमचा प्रचार चालू असल्याचे सांगितले आहे. प्रचारासाठी आम्ही जे हेलीकोप्तर वापरतो त्याचे पेमेंटही आम्ही चेकने केले आहे आणि आमच्याकडे एक एक पैशाचा हिशेब असल्याचे सांगितले आहे. परंतु तरीही हे प्रश्न त्यांना सातत्याने विचारले जात आहेत. आज आयकर खात्याने स्वतःच त्याची शहानिशा केली तेंव्हा त्यांच्या उमेदवाराकडे पैसा आहे किती याचा शोध घेतला तेंव्हा वस्तुस्थिती लक्षात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!