Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जाणून घ्या किती आहे मोदींच्या विशेष विमानाची किंमत ?

Spread the love

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांसाठी बोइंगचं 777-300ER हे विमान घेण्यात येणार आहे. सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यांसाठी बोइंगचं 747-200B हे विमान वापरले जाते. तसेच भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या विदेश दौऱ्यांसाठी एयर इंडियाचं B-747 हे  विमान वापरले  जाते. या विमानाचा ताबा आता एयर इंडियाकडे न राहता एयरफोर्सकडे असणार आहे. अतिशय अत्याधुनिक असलेले हे खास विमान जून 2020 पर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे. कुठल्याही क्षेपणास्त्रांचा (मिसाईलचा) या विमानावर परिणाम होणार नाही. अशी दोन विमानं हवाई दलात दाखल होणार आहेत. या विमानात पंतप्रधानांचं छोटं कार्यालयच स्थापन करण्याची व्यवस्था आहे.

अतिमहत्त्वांच्या व्यक्तिच्या प्रवासासाठी हे विमान खास राखीव ठेवलेले  असते. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्ता नुसार, नव्या काळाची गरज आणि अधिक सुरक्षीत असलेल्या विमानाची गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवं विमान आल्यावर पंतप्रधानांच्या विमानाची सुरक्षा ही अमेरिकेच्या अध्यक्षांच्या तोडीची होणार हे नक्की. दरम्यान या विमानात सर्व व्यवस्था अत्याधुनिक असून कुठल्याही राष्ट्रप्रमुखासाठी त्या गरजेच्या असल्याचा दावा करण्यात येत आहे. कुठलेही क्षेपणास्त्र हल्ले परतवून लावण्याची खास यंत्रणा या विमानात लावण्यात आली आहे. त्याचबरोबर या विमानाची इंधन क्षमताही जास्त असून इंधन भरल्यानंतर हे विमान दिल्लीतून थेट अमेरिकेला जावू शकणार आहे. तसेच या नव्या विमानात एंटी मिसाइल सिस्टिम देखील लावण्यात येणार आहे. ही सिस्टिम अमेरिकेकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी भारताने 19 कोटी डॉलर मोजण्याची तयारी दाखवली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!