Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘तुझ्याकडे पैसे नसतील तर बायकोला पाठव !!’ ‘मुथूट फायनान्स’च्या कर्जवसुली करणाऱ्या महिला एजंटचा प्रताप !!

Advertisements
Advertisements
Spread the love

पुण्यातील मुथूट फायनान्सच्या कर्ज वसुली करणाऱ्या महिला एजंटचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्ज वसूल करण्यासाठी या महिला एजंट कोणत्या थराला जाऊ शकतात याची प्रचिती देणारी एक ऑडिओ क्लिप पोलिसांना देण्यात आली असून या प्रकरणात पोलीस अधिक चौकशी करीत असल्याचे वृत्त न्यूज18 लोकमतने दिले आहे. ‘तुझ्याकडे पैसे नसतील तर बायकोला पाठव !!’  असे  अवमानकारक आणि मानहानीकारक वक्तव्य वसुली एजंट महिलेने केल्यामुळे खळबळ माजली आहे.

Advertisements

विशेष म्हणजे बँकांना आपल्या कर्जाची वसुली कायदेशीर मार्गाने करावी तसेच वसुलीसाठी गुंडगिरीच्या मार्गाचा अवलंब करू नये असे निर्देश रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच दिलेले असताही बँकांकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी अशा मार्गाचा अवलंब करण्यात येत असल्याचे हे उदाहरण समोर आलेले आहे. पोलीस या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements

या वृत्तानुसार पुण्याचे नागरिक प्रभाकर कुतवळ यांना सुप्रसिद्ध मुथूट होमफिन या कंपनीने नेमलेल्या थर्ड पार्टी वसुली एजंट महिलांनी हफ्ता वेळेवर दिला नाही म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली आहे. याविषयी त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे कि , फोन करून कर्ज देता येत नाही म्हणून ‘भिकारी’  म्हणत अपशब्दही वापरले असल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये आहे. एवढं करून या महिला थांबल्या नाहीत तर ‘तुझ्याकडे पैसे नसतील तर बायकोला पाठव !!’  असं संतापजनक विधानही या महिलांनी केले आहे. दरम्यान, महिलांनी अशा प्रकारे वागल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या सगळ्या प्रकरणावर मुथूट कंपनीला विचारलं असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राजेंद्र कोकाटे या पुण्यातील व्यवस्थापकांशी संपर्क केला असा मी पुण्यात नसून कोल्हापूरला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कुतवळ यांनी संबंधित ऑडिओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत. पण कंपनी या प्रकरणात उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान, ग्राहकाशी अशा प्रकारे वार्तालाप करणाऱ्या महिला एजंटवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी कुतवळ यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!