Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : हे कोण “चंपा ” आहेत ज्यांची अजित पवारांनी उडविली खिल्ली !!

Spread the love

“चंपा ” असा उल्लेख करून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये भाजपाच्या एका मोठ्या आणि दिग्गज नेत्याची खिल्ली उडवली. पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी “त्या ‘चंपा’ला पवारांशिवाय काही दिसत नाही,” अशी टीका केली. त्यानंतर ‘चंपा’ म्हणजे नक्की कोण? याचेही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. यावेळी माजी आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे, विरोधी पक्ष नेते नाना काटे आदी उपस्थित होते.

अजित पवार यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली  होती. यावेळी पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या “चंद्रकांत पाटील यांनी पवार कुटुंबातील तरुण भविष्यात भाजपमध्ये येऊ शकतात. आले तर त्यांचे स्वागत आहे,” या वक्तव्याविषयी अजित पवार यांना चंद्रकांत पाटलांविषयी प्रश्न विचारला होता.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “पवारांच्याशिवाय त्या ‘चंपा’ला काही दिसतच नाही. हा शॉर्ट फॉर्म आहे जस ‘अप’ म्हणजे अजित पवार, तस ‘चंपा’ असे  त्यांनी यावेळी सांगितले . त्यांच्या या उत्तरावर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हास्याची लाट पसरली . पुढे ते म्हणाले की, ते (चंद्रकांत पाटील) जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाही. प्रत्येक वेळेस राजकारणातून शरद पवार दूर जातील अस ते म्हणतात. शरद पवार यांनी किती चढउतार पाहिले आहे. ५५ आमदारांपैकी ५० आमदार निघून गेले. पाच आमदार राहिले तरीही तितक्याच तत्परतेने बाहेर पडले. आजही तुम्ही पाहता, शरद पवार हे आक्रमक भूमिकेतून हे सरकार बदलायचे  असे  सांगतात,” असे  उत्तर पवार यांनी दिले .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!