Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Vidhansabha 2019 : राज्याभरातील १ हजार ५०४ उमेदवारांची माघार, ३ हजार २३९ उमेदवार मैदानात, सर्वाधिक उमेदवार अशोक चव्हाण यांच्या विरोधात

Spread the love


विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्याभरातील १ हजार ५०४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आता ३ हजार २३९ उमेदवार आहेत. सर्वाधिक उमेदवार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात २४६ उमेदवार आहेत. तर, सिंधुदूर्ग जिल्ह्यात सर्वात कमी २३ उमेदवार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे दिली.सर्वाधिक उमेदवार नांदेड दक्षिण मध्ये सर्वाधिक ३८ उमेदवार तर सर्वात कमी चिपळूण मतदारसंघात तीन उमेदवार उभे आहेत.


शनिवारी झालेल्या अर्ज पडताळणीनंतर चार हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील एक हजार ५०४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. नंदुरबार जिल्ह्यातील चार मतदारसंघात २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३८ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १०० उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघात ५९ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात ६८ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवार, अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघात १०९ उमेदवार, वर्धा जिल्ह्यातील चार मतदारसंघात ४७ उमेदवार, नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघात १४६ उमेदवार, भंडारा जिल्ह्यातील ३ मतदारसंघात ४२ उमेदवार, गोंदिया जिल्ह्यात चार मतदारसंघात ४७ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात तीन मतदारसंघात ३८ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ७१ उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यातील सात मतदारसंघात ८८ उमेदवार, नांदेड जिल्ह्यातील ९ मतदारसंघात १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तर, हिंगोली जिल्ह्यातील तीन मतदारसंघात ३३ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५३ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७९ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात १२८ उमेदवार, नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघात १४८ उमेदवार, पालघर जिल्ह्यातील ६ मतदारसंघात ५३ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २१४ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात २४४ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८९ उमेदवार, रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघात ७८ उमेदवार, पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघात २४६ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघात ११६ उमेदवार, बीड जिल्ह्यात सहा मतदारसंघात ११५ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ७९ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यातील चार मतदारसंघात ५० उमेदवार, सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघात १५४ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात ७३ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यातील ५ मतदारसंघात ३२ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २३ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १०६ उमेदवार, सांगली जिल्ह्यात आठ मतदारसंघात ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती देण्यात आली.

सर्वाधिक उमेदवार नांदेड दक्षिण मध्ये तर सर्वात कमी चिपळूण मतदारसंघात

सर्वात कमी तीन उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदार संघात आहे. तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात ३१ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी तीन बॅलेट युनिटची (बीयु) आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट (सीयु) एकच लागणार आहे. अकोट, रिसोड, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, साकोली, गोंदिया, गडचिरोली, वणी, नांदेड उत्तर, वैजापूर, नाशिक पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, बेलापूर, पिंपरी, पुणे कॅन्टोन्मेंट, नेवासा, गेवराई, माजलगाव, परळी, लातूर शहर, तुळजापूर, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला, हातकणंगले अशा ३० मतदारसंघांमध्ये १५ पेक्षा अधिक उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. राज्यात ईव्हीएमच्या अत्युच्च उमेदवारसंख्येच्या मर्यादेपेक्षा कमी उमेदवारांची संख्या असल्याने कुठेही मतपत्रिकेवर (बॅलेटपेपर) मतदान घ्यावे लागणार नाही. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघात सर्वाधिक ९१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामधून अर्ज माघारीनंतर केवळ सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!