Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तब्ब्ल ८ वर्षानंतर पोलिसांनी फोडली खुनाला वाचा , प्रियकराच्या मदतीने तिने पतीचा काटा काढला , त्याच्या देहाचे तुकडे करून फेकले आणि धड पुरून टाकले !!

Spread the love


तिच्या शेजाऱ्यावर तीच प्रेम बसलं . प्रेमलीला सुरु झाल्या पण तिच्या घरच्यांना ते पसंत पडलं नाही. तिचं तडकाफडकी तिच्या घरच्यांनी दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून दिलं . पण तीच मन काही नवऱ्याच्या संसारात रमत नव्हतं .  ती सासरी कमी आणि माहेरीच अधिक असायची. शेवटी तिने प्रियकरासोबत बसून नवऱ्याचा कायमचा काटा काढायला प्लॅन रचला आणि नवऱ्याचा काटा काढला . या घटनेला ९ वर्षे उलटली पण खुनाला वाचा फुटलीच आणि पोलिसांचा तपास सुरु झाला ….


दिल्ली पोलिसांनी आठ वर्षानंतर प्रेताच्या अस्थी जमा केल्या आहेत.  या प्रकरणात पोलिसांनी पतीच्या खून प्रकरणात मयताच्या पत्नीचा प्रियकर आणि सदर गुण्यात मदत करणाऱ्या वाहन चालकाला अटक केली असून मुख्य आरोपी मयताच्या पत्नीचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत. दिल्ली गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त बीके सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २३ मार्च २०११ ला समालखा येथील  जय भगवान ने दिल्लीच्या कापसहेड़ा पोलिसात तक्रार दिली होती कि , त्यांचा  २२ वर्षीय मुलगा रवि  तो बेपत्ता झाला त्याच्या एक दिवस आधी तो त्याच्या साल्याला भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. या प्रकरणात पोलिसांनी बेपत्ता आणि अपहरण म्हणून गुन्ह्याची नोंद केली होती आणि तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. आणि आता तब्बल आठ वर्षानंतर गुन्हा उघडकीस आला आहे.

रवि अचानक गायब झाल्यानंतर पोलिसांनी पहिला संशय अर्थातच रविची पत्नी पत्नी शकुंतला, तिचा भाऊ आणि भावाचा मित्र कमलसिंग यांच्यावर आला, जो शकुंतलाचा प्रियकर होता. या प्रकरणात पोलिसांनी २०१२ मध्ये पॉलीग्राफ टेस्ट करूनही तपासात फारशी प्रगती झाली नाही. त्यानंतर त्या दोघांचीही २०१७ मध्ये ब्रेन मैपिंग टेस्ट करण्यात आली . या टेस्ट में शकुंतला च्या भावाला क्लिनचीट देण्यात आली. परंतु कमलच्या टेस्ट मध्ये मात्र पोलिसांना काही गोष्टींचा उलगडा झाला त्यात समजले कि कमलनेच शकुंतलाला सांगितले कि, तू रवि सोबत लग्न करून घे. पुढे हे सुद्धा समजले कि , कमलनेच रवीचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावली आहे. या ब्रेन मैपिंग टेस्ट च्या नंतर शकुंतला आणि कमल हे दोघेही बेपत्ता झाले. परंतु गुन्हे शाखेने २७ सप्टेंबरला कमल सिंगला अलवर, राजस्थान येथील  शालीमार कॉलोनीतून अटक केली आणि कबुली जबाब दिला कि वाहनचालक गणेशने रविचे अपहरण केल्यानंतर त्यानेच रवीची हत्या केली आणि अलवार येथे प्रेताची विल्हेवाट लावली.

त्यानंतर पोलिसांनी गणेशला बिहारच्या समस्तीपुर येथून अटक केली. दरम्यान ५ ऑक्टोबरला दोन्ही आरोपींनी अलवर येथील ज्या जागेवर रवीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली ते ठिकाण दाखविले. या ठिकाणी खोदकाम केले तेंव्हा पोलिसांना सहा फुट खोल खोदलेल्या खड्ड्यात मानवी हाडाचे २५ तुकडे मिळाले.

पोलीस तपासात निष्पन्न झाले कि , कमलचा ट्रांसपोर्ट आणि बिल्डिंग मटेरियल पुरवठा करण्याचा व्यवसाय होता. सन 2010 मध्ये त्याने शकुंतला च्या शेजारी त्याने घर बांधले आणि तेंव्हापासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान सन 2011 मध्ये शकुंतलाचा विवाह समालखा येथील रविबरोबर झाला, परंतु शकुंतलाचे मन सासरी रमत नव्हते. अखेर तिने कमलला पतीचा काटा काढण्यासाठी प्रवृत्त केले.  नियोजन केल्याप्रमाणे रवी जेंव्हा त्याच्या मेहुण्याच्या घराकडे जात होता तेंव्हा कमलने त्याला स्वतःच्या सँट्रो कारमध्ये बसवले आणि शकुंतलाला त्याच्या बहिणीच्या घरी सोडून तो त्याला गाडीमध्ये बसवून घेऊन गेला. पुढे वाहनचालकाच्या मदतीने त्याने रवीचा गाला दाबून खून केलं त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि हे तुकडे . रिवाड़ी – अलवर रस्त्यावर फेकून दिले तर धड आणि बाकी तुकडे  अलवर जवळ स्वतःच्या कार्यालयाजवळ १० फूट खड्डा करून त्यात पुरून टाकले. या कामात मदत करून कुणाला न सांगण्याबद्दल त्याने चालकाला ७० हजार रुपये दिले.

दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी शकुंतला फरार असून तिला शोधण्याचे काम चालू आहे आणि मिळालेल्या हाडांच्या तुकड्याची डीएनए टेस्ट करण्यात येत आहे. मयत रवि रिक्षा चालवून घर चालवायचा. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस रवीचा शोध घेत होती. अखेर ८ वर्षांनंतर पोलिसांना रवीच्या मृतदेहाचा शोध घेण्यात यश आलं असून आता पुढील तपास सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!