Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रमुख पक्षांसमोर बंडोबांना थंड करण्याचे मोठे आव्हान , मुख्यमंत्रीही कमला लागले !!

Spread the love

विधानसभेसाठी राज्यात २८८ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर ज्या इच्छुकांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली नाही त्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरीमुळे  केल्यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्या  बंडखोरीचा अधिकृत उमेदवारांना फटका बसू नये म्हणून बंडोबांना थंड करण्याचा प्रयत्न आता पक्षनेतृत्वाकडून केला जात आहे. भाजपमधून बंडखोरी केलेल्या उमेदवारांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संपर्क साधून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगत असल्याचे वृत्त आहे.

राज्यातील २७ विधानसभा मतदारसंघात तब्बल ११४ जणांनी बंडखोरी केली आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भाजपचे सर्वाधिक ९ बंडखोर आहेत. विधानसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या किती बंडखोर आपली उमेदवारी मागे घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्यातील तब्बल ७९८ इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित

राज्याच्या विधानसभेत  जाण्यासाठी प्रत्येक नेता इच्छुक असतो त्यासाठी  ५ वर्ष  तयारी करतात तसे याही वेळी झाले आणि ऐन मोक्याच्या क्षणी अर्ज भरण्यात झालेल्या  चुकीमुळे यंदा राज्यातील तब्बल ७९८ इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहिले. यात प्रमुख पक्षांच्या इच्छुकांचाही समावेश आहे . दरम्यान  राज्यभरातील तब्बल ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी यातील प्रत्येकजण आता कार्यरत झाला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५५४३ उमेदवारांपैकी ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!