Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PMC Bank Scam : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन अटकेत

Spread the love

बहुचर्चित पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील (पीएमसी बँक) ४ हजार ३५५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज बँकेचे माजी चेअरमन वरयाम सिंग यांना अटक केली. याआधी शुक्रवारी बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक करण्यात आली असून त्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, पीएमसी बँक घोटाळ्यात आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे.

पीएमसी बँकेतील घोटाळा उघड झाल्यानंतर पोलीस गेल्या काही दिवसांपासून वरयाम सिंग यांचा शोध घेत होते. अखेर आज ते पोलिसांच्या हाती लागले असून माहीम चर्च येथून त्यांना अटक करण्यात आली आहे व ४२०, ४०९, ४६५, ४६४, ४०६, ४७१, १२० ब या कलमांन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी विशेष तपास पथक करत आहे, अशी माहिती उपायुक्त प्रणय अशोक यांनी माध्यमांना दिली. दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर नियुक्त केलेल्या प्रशासकाने बँकेचे वरिष्ठ अधिकारी व एचडीआयएलविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांच्या तपासात या प्रकरणातील बडे मासे हाती लागले आहेत.

रियल इस्टेटमधील मोठे नाव असलेल्या एचडीआयएल ग्रुपला अवैध पद्धतीने कर्ज दिल्याचं हे प्रकरण असून याप्रकरणी गुरुवारी या ग्रुपचे संचालक राकेश वाधवान व त्यांचे पुत्र सारंग यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या कारवाईपाठोपाठ अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) कारवाईचा दणका देत वाधवान यांच्या मालकीचे खासगी जेट व अनेक कार जप्त केल्या आहेत. शिवाय वाधवान यांच्या अनेक ठिकाणांवर शुक्रवारी ईडीने छापे टाकले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!