Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नागपुरातील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनदिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन, देश- विदेशातील मान्यवरांची उपस्थिती

Advertisements
Advertisements
Spread the love

बौद्ध धर्मीयांसाठी महत्वाच्या असणाऱ्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर  धम्मक्रांतीचा ६३वा वर्धापनदिन सोहळा मंगळवार, ८ ऑक्‍टोबरला सायंकाळी ६ वाजता दीक्षाभूमीवर साजरा होणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली . या पत्रपरिषदेला स्मारक समिती अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, सदस्य एन. आर. सुटे, कैलास वारके आदी उपस्थित होते.

Advertisements

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४, ऑक्‍टोबर १९५६ रोजी नागवंशीयांच्या भूमीत लाखो वंचितांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला होता . त्यानॉमित्ताने देश आणि जगभरातील बौद्ध बांधव अत्यंत श्रद्धेने अशोक विजयादशमीच्या दिवशी  नागपूर शहरात हजेरी लावतात.

Advertisements
Advertisements

दीक्षाभूमीच्या प्रांगणात आयोजित मुख्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून थायलंडचे पूज्य भन्ते डॉ. परमहा अनेक व म्यानमारचे महाउपासक टेंग ग्यार यांची उपस्थिती राहणार आहे. यंदा प्रथमच निवडणूक आचारसंहिता लागली असल्याने राजकीय हजेरीला फाटा मिळाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर प्रथमच धम्मचक्र प्रवर्तनदिनाला धार्मिकता व वैचारिकतेचे स्वरूप आले आहे. स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी पत्रपरिषदेत धम्मचक्र प्रवर्तनदिनाची माहिती दिली.

सोमवार, ७ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता विलास गजघाटे, अॅड. आनंद फुलझेले व एन. आर. सुटे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होईल. तसेच समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात येणार आहे. याशिवाय दिवसभर दीक्षा देण्याचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. सायंकाळी ६ वाजता भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली धम्मपरिषद होईल. यावेळी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी ते संबोधित करतील. याचदिवशी रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. मुख्य सोहळा असलेल्या मंगळवार, ८ ऑक्टोबरला स्मारक समितीतर्फे सकाळी ६ वाजता ‘धम्मपहाट’अंतर्गत बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे बौद्ध अनुयायांना सामूहिक बुद्धवंदना देतील. यानंतर दिवसभर दीक्षा देण्यात येईल. तसेच सायंकाळी ६ वाजता मुख्य सोहळ्याचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!