Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विंग कमांडर अभिनंदन यांच्या ५१ क्वाड्रनचा वायुदलाकडून विशेष सन्मान

Spread the love

विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान केला जाणार आहे. अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानच्या हवाई घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या कामगिरीबद्दल त्यांच्या स्क्वाड्रन  ५१ चा वायुदलाकडून सन्मान विशेष सन्मान होणार आहे. अभिनंदन वर्थमान यांच्या धाडसाचं कौतुक सगळ्या देशानं केले  होते. आता वायुदलाकडून त्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार हे ५१ क्वाड्रनचा हा सन्मान स्वीकारणार आहेत.

भारतीय हवाईदलाचे प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरीया हे अभिनंदन यांच्या स्क्वार्डनचा विशेष सन्मान करणार आहेत. या व्यतिरिक्त बालाकोट एअरस्ट्राइक यशस्वीपणे राबवणाऱ्या ९ क्वाड्रनचा देखील विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याच क्वाड्रनच्या मिराज २००० या लढावू विमानांनी ‘ऑपरेशन बंदर’ यशस्वी केले होते. ९ क्वाड्रनला देखील यूनिट प्रशस्तीपत्र देण्यात आले होते. बालाकोट एअरस्ट्राइक आणि पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना परतवून लावणारी क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवालच्या ६०२ सिग्नल यूनिटचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.

पुलवामा या ठिकाणी १४ फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बरोबर तेरा दिवसांनी बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईक दरम्यान महत्त्वाची कामगिरी बजावली ती अभिनंदन वर्थमान यांनी. त्यांनी पाकिस्तानचे हवाई हल्ला करणारे विमान खाली पाडले. ही कामगिरी बजावत असताना अभिनंदन यांचे विमानही अपघातग्रस्त झाले.

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना कैद केले.  अभिनंदन वर्थमान दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते. केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतल्यामुळे एक मार्च रोजी पाकिस्तानने त्यांची सुटका केली. २७ फेब्रुवारीला दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांनी वीर चक्र पुरस्कार जाहीर झाला. परमवीर चक्र, महावीर चक्र यानंतर वीर चक्र हा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. आता त्यांच्या स्क्वार्डनचा वायुदलातर्फे विशेष सन्मान केला जाणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!