Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘आरे’ प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनाही अटक, निषेधार्थ कार्यकर्ते रस्त्यावर

Spread the love

आरे वृक्षतोडीच्या वादात आता वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. आरे परिसरात मेट्रो कारशेडच्या नावने वृक्षतोड करुन जागा हडपण्याचा डाव आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भाजपा, शिवसेना सरकारला इथली जागा हडप करायची आहे. एवढंच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही स्वार्थ यामध्ये आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. शिवसेना वरवर विरोध करत आहे. मात्र ही सगळी नाटकं आहेत. येत्या निवडणुकीत आता जनताच त्यांना उत्तर देईल असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पवई फिल्टरपाडा या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. दरम्यान सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःला अटक करवून घेतली. पोलिसांच्या बसमध्ये फ्रंट सीटवर बसून प्रकाश आंबेडकर आंदोलन स्थळावरुन रवाना झाले. मुंबईकर या सरकारला आरे वृक्षतोडीवरुन योग्य उत्तर देतील असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

शुक्रवारी रात्री उशिरा आरे परिसरतील झाडं कापण्यात आली. ज्याचा पर्यावरण प्रेमींनी कडाडून निषेध नोंदवला. आरे परिसरात मेट्रो चे कारशेड उभारले जाणार आहे त्यासाठी या ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली. हे सगळे प्रकरण कोर्टात होते. कोर्टाने कारशेडला आडकाठी करता येणार नाही असे सांगितल्यावर तो आदेश ज्या दिवशी आला त्यादिवशी रात्री या भागात वृक्षतोड करण्यात आली. ज्याचा पर्यावरण प्रेमींनी, काँग्रेसने, राष्ट्रवादीने आणि शिवसेनेनेही निषेध नोंदवला. मात्र हे या सगळ्या राजकीय पक्षांचं नाटक आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. इतकंच नाही तर मेट्रो कारशेडच्या नावे या सगळ्यांना इथली जागा हडप करायची आहे असाही आरोप त्यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!