Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

माझ्याकडे का बघतोस ? म्हणून रेकाॅर्डवरच्या भावी डाॅक्टर कडून खुनाचा प्रयत्न, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

औरंगाबाद – माझ्याकडे का बघतो असे म्हणंत दारुच्या नशेत चाकू हल्ला करणार्‍या रेकाॅर्डवरील भावी डाॅक्टरला हर्सूल पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
वैभव उत्तम डहाके (२१) रा. मयुरपार्क असे अटक आरोपीचे नाव आहे. या पूर्वी सिडको पोलिस ठाण्यात वैभव डहाकेवर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल आहे तर हर्सूल पोलिस ठाण्यात हाणामार्‍या करण्याचा गुन्हा दाखल आहे.

काल १ऑक्टोबर ला रात्री ११.३० च्या सुमारास आरोपी वैभव डहाकेयाने दारुच्या नशेत रस्त्यावर गप्पा मारत उभ्या असलेल्या  तरुणावर चाकू हल्ला केला.त्यानंतर हर्सूल पोलिसांनी वरील आरोपीचा कसून शोध घेतला. शेवटी पहाटे १ च्या सुमारास आरोपी पकडण्यात आला.पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शना खाली पीएसआय कल्याण चाबूकस्वार यांनी आरोपी ला अटक केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!