Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अधिकाऱ्यांना दम भरताना गडकरी म्हणाले , मी आधी नक्सलवादी होतो , मला पुन्हा नक्षलवादी बनायला भाग पाडू नका

Spread the love

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी  त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात . आता तर त्यांनी ‘मी आधी नक्षलवादी होतो नंतर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये गेलो. मला पुन्हा नक्षली व्हायला भाग पाडू नका.,’  असे वक्तव्य करून स्वतःविषयीची नवीनच माहिती दिली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या समोरच रस्ते बांधणीच्या कामांमध्ये अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांना गडकरी यांनी खडे बोल सुनावले आहेत. दिल्ली येथील गडकरींच्या कार्यालयामध्ये केरळमधील कामांचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीमध्ये गडकरींनी हे वक्तव्य केलं. काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री विजयन यांनी केरळमधील रस्त्यांचे प्रकल्प अडकून पडण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. मागील अनेक वर्षांमध्ये केरळने कमावलेले सर्व काही केंद्राच्या आडमुठ्या भूमिकेमुळे गमावण्याची शक्यता आहे, असं सांगत विजयन यांनी राज्यातील महामार्ग विकासाच्या थांबलेल्या कामांसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती.

बैठकीत बोलताना गडकरी म्हणाले कि , वेगवेगळ्या विकासकामांच्या फाइल अडवून ठेऊ नका. अडचणी निर्माण करणार कोण आहेत ‘मला ठाऊक आहे . पण इथे मी बॉस आहे हे लक्षात घ्या. राज्यातील रस्त्यांच्या कामासाठी विजयन यांनी मला भेटण्याची ही पाचवी वेळ आहे. हे लज्जास्पद आहे,’ असं मत गडकरींनी अधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केलं. आपल्या या इशाऱ्यामध्ये गडकरींनी सरकारी अधिकाऱ्यांना रस्ते बांधणीसाठी जमीन अधिग्रहण करायला अल्टीमेट दिला आहे. वेळेत कामं झाली नाहीतर गाठ माझ्याशी आहे असंही गडकरींनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.

केरळ सरकारने राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी २५ टक्के खर्च उचलण्याची तयारी दाखवल्यानंतर केंद्राने अनेक प्रकल्पांना मंगळवार तातडीने मंजुरी दिली आहे.

मंगळवारी गडकरींची भेट घेण्याआधी केरळचे मुख्यमंत्री वायनाडचे  खासदार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राष्ट्रीय महामार्गावर रात्री अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतुककोंडीसंदर्भात काय करता येईल यावर या दोघांनी चर्चा केली. तसेच नवीन महामार्ग बांधताना स्थानिकांच्या विस्थापन आणि पुनर्वसनासंदर्भातील माहिती राहुल यांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!