Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शेतक-यांना लाखो रुपयांना गंडा घालणारा व्यापारी गजाआड , शनिवारपर्यंत पोलिस कोठडी

Spread the love

औरंंंगाबाद : तब्बल ६४ शेतक-यांना २० लाख ३० हजार २३६ रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात व्यापारी गजानन रावसाहेब शिंदे याला मंगळवारी अटक करण्यात आली. गजानन शिंदे याला बुधवारी (दि.२) न्यायालयात हजर करण्यात आले असता, शनिवारपर्यंत (दि. ५ ) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायमुर्ती एस. एस. दहातोंडे यांनी दिले.

या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय आश्रुबा शिरसाठ (वय ४३, रा. नंदनवन कॉलनी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, बाजार समितीची उपबाजारपेठ असलेल्या करमाड येथे आरोपी व्यापारी गजानन रावसाहेब शिंदे (वय ३९, रा. पठार देऊळगाव, ता. बदनापूर, जि. जालना) याने आडत दुकानाचा परवाना घेऊन श्री चक्रधरस्वामी व्हिजिटेबल कंपनी या नावाने शेती मालाचा आडत खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यावसायाअंतर्गत आरोपीने परिसरातील शेतक-यांकडून टोमॅटो व डाळींबाची खरेदी केली आणि त्या शेतक-यांना आरोपीने पंजाब नॅशनल बँकेचे धनादेश दिले. मात्र ते धनादेश वटलेच नाहीत. शेतक-यांनी गजानन शिंदे याच्याकडे पैशांसाठी सातत्याने पाठपुरावा केला; परंतु त्याने वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन दुकानातील सर्व सामान घेऊन पोबारा केला होता.
दरम्यान आरोपीने ६४ शेतक-यांची २० लाख ३० हजार २३६ रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विजय शिरसाट यांनी दिलेल्या तक्रारीवरुन करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!