Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : वंचित बहुजन आघाडीची १७७ उमेदवारांची यादी घोषित, औरंगाबाद मध्यमधून अमित भुईगळ

Spread the love

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज तब्बल १७७ उमेदवारांची जम्बो यादी जाहीर केली आहे. या यादीतून वंचितने भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार बळीराम शिरस्कर यांचा बाळापूरमधून पत्ता मात्र कापला आहे. यामध्ये जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवारांचाही समावेश आहे. आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीने १७७उमेदवार घोषित केले आहेत. ‘वंचित’ महाराष्ट्रातल्या सर्व २८८ जागा लढविणार असल्याचा प्रकाश आंबेडकर यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , वंचित बहुजन आघाडी २८८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत सगळ्याच म्हणजे २८८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. 


अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन १७७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उमेदवारांना तिकीट देताना वंचितने त्यांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे. सर्व जातींना सत्तेत सहभागी करता यावे यासाठी वंचितने त्यांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे.


मराठवाड्यातील उमेदवारांमध्ये  जालना -अशोक खरात, बदनापूर -राजेंद्र मगरे , भोकरदन- दीपक बोराडे, सिल्लोड- दादाराव वानखेडे,  कन्नड -अनिल चव्हाण,  फुलंब्री -जगन्नाथ रेठे ,  औरंगाबाद मध्य -अमित भुईगळ,  पैठण-विजय चव्हाण,  गंगापूर-अंकुश काळवणे,  वैजापूर- प्रमोद नांगरे पाटील, किनवट-हेमराज उईके, भोकर -नामदेव पवार,  नांदेड उत्तर – मुकुंद चावरे,  नांदेड दक्षिण -फारुख अहमद, लोहा- विनोद पवार, नायगाव- मारुतीराव कवळे,  देगलूर- रामचंद्र भराडे,  वसमत -शेख फरीद , जिंतूर -मनोहर वाकळे,  परभणी- शेख महंमद गौस,  गंगाखेड -करुणा कुंडगीर,  पाथरी -विलास बाबर,  परतूर -राजपाल सिंग राठोड आदींचा समावेश आहे.


राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात वंचितने जामनेरमधून सुमीत चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तसेस कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधातही वंचितने उमेदवार जाहीर केला आहे. भोकर मतदारसंघामधून वंचितने नामेदव आईलवार यांना रिंगणात उतरवले आहे.

‘वंचित’ महाराष्ट्रातल्या सर्व २८८ जागा लढविणार असल्याचा प्रकाश आंबेडकर यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली. आंबेडकरांच्या या घोषणेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभेत एमआयएम वंचित सोबत होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत एमआयएमही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याने मुस्लिम आणि बहुजन मतांची मोठ्या प्रमाणावर विभागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडी २८८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत सगळ्याच म्हणजे २८८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. अर्धा सीपीएम, महाराष्ट्र विकास आघाडी, असे लोक आमच्यासोबत आहेत. निवडणुकीसाठी गोपीचंद पडळकर ते भाजपमध्ये गेले आहेत. आणि निवडणुकीनातर ते आमच्याकडे परत येतील असंही आंबेडकर यांनी सांगितले. त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा आहेत असंही त्यांनी सांगितले.


दरम्यान भिडे यांच्या बुद्धाविषयीच्या वक्तव्यावर बोलताना , शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे विद्वान आहेत. मी त्यांच्यावर कुठलेही भाष्य करणार नाही, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भिडे यांच्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. जगासाठी बुद्ध उपयोगाचा नाही, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर असंख्य जणांनी टीका केलेली असताना तसेच अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे सुपूत्र सुजात आंबेडकरांनी टीका केलेली असताना प्रकाश आंबेडकरांनी मात्र यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.


लोकसभेच्या निवडणुकीत वंचित मुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला होता. आघाडीला १० ते १२ जागांचा फटका बसल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे विधानसभेत काय निकाल लागतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वंचितचा जो मतदार आहे तो काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे त्यात खिंडार पडण्याची शक्यता आहे. आमचा मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी हा भाजप-शिवसेना असल्याचे  प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे तर वचिंत हाच आमचा मुख्य विरोधक आहे असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते त्यामुळे राजकीय सामना चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.

 

 

Click to listen highlighted text!