Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विविध राज्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या ६९ उमेदवारांची यादी जाहीर, गुजरातच्या ६ जगाचाही समावेश, काँग्रेसचेही ४ उमेदवार जाहीर

Spread the love

भारतीय जनता पार्टीने विविध राज्यांमध्ये होणार असलेल्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. आज (रविवार) भाजपाकडून ३९ उमेदवारांचा नावांची यादी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, ओदिशा, छत्तीसगड, आसम, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, गुजरात  आणि तेलंगण या राज्यांधील विधानसभा पोटनिवडणुकांच्या उमेदवारांचा समावेश आहे.

भाजपाने उत्तर प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दहा उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच, गुजरात -६, केरळ -५, आसाम – ४, पंजाब -२, हिमाचल प्रदेश -२, सिक्कीम -२, बिहार -१, छत्तीसगड -१, मध्यप्रदेश -१, मेघालय -१, ओदिशा -१, राजस्थान -१, तेलंगण -१ या जागांचा यादीत समावेश आहे.

१७ राज्यांमधील विधानसभेच्या ६४ जागांसाठी २१ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. याशिवाय आज (रविवार) भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा होईल.

Click to listen highlighted text!