Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना वाटले एबी फॉर्म !! औरंगाबाद पश्चिममधून संजय सिरसाट यांचा समावेश

Spread the love

शिवसेना आणि भाजपच्या युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने त्यांच्या उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यास केली सुरवात.शिवसेनेनं त्यांच्या कोट्यातील मतदारसंघातील उमेदवारांना AB फार्म वाटण्यास सुरवात केली आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील जे उमेदवार मुंबईत उपस्थित आहेत त्यांना देखील AB फॉर्म देण्यात आलेत. सध्या युतीत ज्या मतदारसंघाचा जागावाटपाचा प्रश्न सुटलेला आहे. अशाच मतदारसंघातील उमेदवारांना शिवसेना AB फॉर्म देत असल्याचे  वृत्त असून औरंगाबाद पश्चिममधून संजय सिरसाट यांना एबी फॉर्म मिळाला आहे.


दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत चालू असून या बैठकीला संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरुवात झाली आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील उपस्थित आहेत. आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय होणार आहे.

यानिमित्ताने मुखमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून युती होणार असल्याचे संकेत मिळालेअसून त्यावरूनच शनिवारी उद्धव ठाकरे यांनी युती होणार असल्याचे घोषित केले होते . सध्या वादाच्या जागावाटपावर चर्चा होत असून मात्र  भाजपच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे.


शिवसेनेने मात्र युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच आपले सीटिंग आमदार आमदार ज्या जागा निर्विवाद आहेत त्या जागेचे फॉर्म वाटले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!