Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आता बुद्धावरून संभाजी भिडे भिडले थेट मोदींना , आव्हाड म्हणाले “बुद्ध समजायला बुद्धी लागते , भिडेंना मानसिक उचाराची गरज “

Spread the love

संयुक्त राष्ट्राच्या सभेमध्ये ७४ व्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलताना ‘भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला’ असे वक्तव्य केले होते . त्याच्या या वक्तव्यावर मोदींचे लाडके संभाजी भिडे यांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे आता पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान भिडेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना राष्ट्रवादीचे नेते यांनी “बुद्ध समजायला बुद्धी लागते , भिडेंना मानसिक उचाराची गरज ” असल्याचे प्रतिपादन केले आहे.

सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडचं आयोजन केलं होतं. या दौडमध्ये बोलताना भिडे  म्हणाले, ‘भारताने जगाला बुद्ध दिला हे अजिबात बोलायचं नाही. पंतप्रधान हे चुकीचे बोलले होते. निती-धर्म संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी दिलं आहे.’ त्यांच्या या आक्षेपामुळे पुन्हा एकदा संभाजी भिडे गुरूजी चर्चेत येणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


बुद्ध समजायला बुद्धी लागते. कोणालाही बुद्ध समजत नाही : जितेंद्र आव्हाड

दरम्यान भारताने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध उपयोगाचा नाही, अशी मुक्ताफळं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी उधळल्यानंतर  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा यथेच्छ समाचार घेतला आहे.बुद्ध समजायला बुद्धी लागते. कोणालाही बुद्ध समजत नाही. मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की त्यांनी भिडेंनी चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवून घ्यावं, अशी जोरदार टीका आव्हाडांनी केली आहे. ते थोडक्यातशी बोलत होते. समता आणि बंधुत्वाची जगाला पहिल्यांदा ओळख करून देणारा महामानव कोण तर ते गौतम बुद्ध होते. दुर्दैवाने महाराष्ट्रात गोडसेंनंतर भिडे जन्माला आले आहे, असा घणाघात आव्हाडांनी केला. तुम्ही जर बुद्धाला कमी लेखणार असाल तर तुमची जगमान्यता निघून गेल्याशिवाय राहणार नाही, अशी भितीही आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केली.


या पूर्वीही  संभाजी भिडे यांनी  वादग्रस्त विधानं केली आहेत. ‘आंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होतेच हे कोर्टात सिद्ध करेन. विशिष्ट आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते. या आंब्यावर ऑस्ट्रेलियात संशोधन झालं आहे. त्यात या आंब्यात ती शक्ती असल्याचं सिद्ध झालं आहे. भारतातही अनेकांनी सशोधन केलं असून त्यातही ती गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे हे योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे,’ असं म्हणत संभाजी भिडे यांनी मोठा वाद ओढवून घेतला होता. या वक्तव्यानंतर भिडेंवर राज्यभरातून चौफेर टीका झाली होती.

दरम्यान ‘मनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे आणि राज्यघटनाही आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून लिहिली,’ असा भिडेंनी केला होता. त्यानंतर अनेक अभ्यासकांनी हा दावा खोडून काढल्याने भिडेंची हे वक्तव्य निराधार असल्याचं सिद्ध झालं होतं.

याशिवाय ‘ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ. गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपेक्षाही श्रेष्ठ होता’, असं धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी केलं. त्यानंतर भिडे यांना राज्यभरातील लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान शेतातील ते आंबे खाऊन तुम्हाला बुध्द कळणार कसा?? असा बोचरा वार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. हा मोदींचे गुरु आणि शिष्य मोदींमधील विषय असला तरी भीमा-कोरेगाव दंगलीच्या आरोपीकडून अशाच विचारांची अपेक्षा आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!