Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Pune Crime : आजीचा उशीने तोंड दाबून खून केल्यानंतर पळून गेलेल्या नातवाला पोलिसांकडून अटक

Spread the love

व्यसनासाठी पैसे देत नसल्याच्या रागातून  बावीस वर्षीय नातवानेच कल्यानीनगर येथील आजीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. खून केल्यानंतर नातू हिमाचल प्रदेशाला पळून गेला होता. पण तेथे एका चोरीच्या गुन्ह्यात हिमाचल प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली असून, कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यावर येरवडा पोलिसांना त्याचा ताबा देण्यात येईल.

आरोपीचे नाव ओशम संजय गौतम (वय २२, रा. हिमाचल प्रदेश) असे आहे तर चांदणी चौहान (वय ६७, रा. सनशाइन सोसायटी, कल्याणीनगर) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मनीष आनंद पिंपुटकर (वय ४३, रा. शिवाजीनगर ) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदणी चौहान यांच्या मुलीचा ओशम हा नातू आहे. ओशम पाच वर्षांचा असताना त्याच्या आईचा विमान दुर्घटनेत अपघाती मृत्यू झाला होता. ओशम जस जसा मोठा होत गेला, तसा तो व्यसनाधीन झाला. आईच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पैशांवरून त्यांच्यात वाद सुरू झाले. याबाबत चांदणी यांनी आपल्या मुंबईत राहणाऱ्या भावाकडे ओशमची तक्रार केली होती. यादरम्यान, ओशम हिमाचल प्रदेशमध्ये मित्रासोबत राहत असताना त्याची दुचाकी आणि एटीम कार्ड चोरून पळून गेला होता. मित्राच्या चोरलेल्या एटीममधून त्याने दीड लाख रुपये काढले. त्यानंतर काही दिवसांनी तो पुण्यात आजीकडे आला. येथे पुन्हा त्यांच्यात पैशावरून भांडणे झाली. त्यामुळे ओशमने उशीने आजीचे तोंड दाबून खून केला. खून केल्यावर घरातील पैसे आणि काही दागिने चोरून पुन्हा हिमाचल प्रदेशला पळून गेला. मुंबईतील नातेवाईक वारंवार चांदणी यांना संपर्क करीत होते. पण संपर्क होत नसल्याने पुण्यातील त्यांचे मित्र मनीष पिंपुटकर यांना कल्याणीनगरला जाण्यास सांगितले. पिंपुटकर गुरुवारी रात्री कल्याणीनगरला गेल्यावर त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे समजल्यावर पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी फ्लॅटचे दार तोडल्यावर चौहान यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आला. पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केल्यावर ओशमचे नाव पुढे आले.

चांदणी चौहान यांच्या मुलीचा ओशम हा नातू आहे. ओशम पाच वर्षांचा असताना त्याच्या आईचा विमान दुर्घटनेत अपघाती मृत्यू झाला होता. कालांतराने सरकारकडून अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत मिळाली होती. पण ओशम लहान असल्याने मिळालेली आर्थिक मदत बँकेत फिक्स डिपॉझिट करण्यात आली होती. ओशमला अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत आजी चांदणी चौहान या वारसदार होत्या. ओशम जस जसा मोठा होत गेला, तसा तो व्यसनाधीन झाला. त्यामुळे आईच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पैशांवरून वाद सुरू झाले. व्यसनासाठी पैसे मिळत नसल्याने ओशमने अनेकदा आजीशी भांडणे करून वाद घातला होता. यातून त्याने आजीचा खून केल्याचे समोर आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!