Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दंगली घडणाऱ्या भिडेंना बुद्ध समजणार नाही , सुजात आंबेडकरांची संघ आणि मोदींवरही टीका

Spread the love

जगासाठी बुद्ध यांचा उपयोग नाही, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी भिडे , संघ आणि मोदींवरही सडकून टीका केली आहे. अमेरिका दौऱ्यावर असताना संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलताना मोदी यांनी भारतभूमी ही युद्धाची नव्हे तर बुद्धाची भूमी आहे. जगाला आम्ही बुद्ध दिला आहे, असे म्हटले होते. पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर संभाजी भिडे यांनी बुद्धांचा उपयोग नसल्याचे म्हटले आहे.

संभाजी भिडे हे दंगली घडवणारे आहेत. त्यांना बुद्ध समजणार नाही. लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नसणाऱ्या व्यक्तीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, अशी टीका सुजात आंबेडकर यांनी केली. सुजात आंबेडकरांनी भिडे यांच्यावर टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. पंतप्रधान मोदी आणि संघाचे नेते भारतात असताना स्वत:ला नथुराम गोडसेचे समर्थक म्हणवून घेतात. मात्र, विदेशात गेल्यानंतर त्यांना बुद्धाची आठवण येते, असे सुजात यांनी म्हटले आहे.

संभाजी भिडे यांनी रविवारी सांगलीत शिवप्रतिष्ठान संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीच्यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताने जगाला बुद्ध दिला, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करू शकतो. ते आपले काम आहे. भारताने जगाला बुद्ध दिला असला तरी बुद्ध काही उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज हेच हवे आहे, असे भिडे यांनी म्हटले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!