सोमवारी मनसेचा मेळावा – ईडी चौकशीनंतर पहिल्यांदाच बोलणार राज ठाकरे

MNS chief Raj Thackeray addresses a press conference at his residence Krishnakunj in Shivaji Park on Tuesday. Express Photo by Prashant Nadkar. 26.06.2018. Mumbai. *** Local Caption *** MNS chief Raj Thackeray addresses a press conference at his residence Krishnakunj in Shivaji Park
येत्या सोमवारी मुंबईत मनसेचा मेळावा पार पडणार असून या मेळाव्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर राज काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. त्याशिवाय ईडीच्या चौकशीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे जाहीर सभेला संबोधित करणार असल्याने मनसे सैनिकही उत्सुक आहेत.
येत्या सोमवारी ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. मनसेने विधानसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले असून या मेळाव्यात राज ठाकरे मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादीही जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सोमवारीच मनसेची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या शिवाय राज ठाकरे राजकीय भाष्य करणार असल्याचेही सांगण्यात येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता या मेळाव्याकडे आहे.