Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अधिसूचना जारी, पहिल्या दिवशी राज्यात १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

Spread the love

पहिल्या दिवशी राज्यात १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास आज सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी राज्यात 14 मतदारसंघात 14 उमेदवारांनी  15 नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.


विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने आज निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार इच्छुकांना कालपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ४ ऑक्टोबर अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची अधिसूचना काल  जारी केल्याने  खऱ्या अर्थाने निवडणूक कार्यक्रमाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार असून काल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ४ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. काल  पितृपक्ष असल्याने अनेक उमेदवारांनी अर्ज भरण्यास टाळले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार आहे. आज  शनिवार आणि उद्या  रविवार असल्याने तसेच २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज मिळणार नाहीत तसेच ते स्वीकारण्यात येणार नाहीत, असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे.

रविवारी नवरात्रीची घटस्थापना आहे. त्यामुळे नवरात्रीचा मुहूर्त साधत ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१९ या दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची गर्दी होईल. ४ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान होत आहे. हरयाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबरला संपत आहे. हरयाणात १ कोटी ८२ लाख ९८ हजार ७१४ मतदार आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना जारी होणार

४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत

५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी

७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत

२१ ऑक्टोबर : मतदान

२४ ऑक्टोबर : मतमोजणी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!