Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

निवडणुकीत पैशाच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी सतर्क राहण्याचे विशेष खर्च निरीक्षक मधू महाजन यांचे निर्देश

Spread the love

विधानसभा निवडणुकीमध्ये पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, असे निर्देश राज्यासाठीच्या विशेष खर्च निरीक्षक श्रीमती मधू महाजन यांनी आज दिले.

निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमती महाजन आणि प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीत आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, वस्तू आणि सेवा कर आयुक्त ए. शैलजा आदी उपस्थित होते.

आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग व महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागांनी निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा आणि मद्याचा वापर याला आळा घालण्यासाठी तसेच अवैधरित्या मद्य आणि रोकड वाहतूक यावर लक्ष ठेवण्याची सक्षम यंत्रणा कार्यान्वित करावी अशा सूचना दिल्या.

रोख रक्कमेची वाहतूक, पैशाचे हस्तांतरण यावर लक्ष ठेवावे. उमेदवारांचा निवडणूक खर्च आणि अवैध पैशांचा वापर याबाबत काटेकोर पर्यवेक्षण करण्यात यावे, आदी सूचना देण्यात आल्या.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग तसेच एमजीएसटी विभागाने केलेली चेकपोस्ट, भारतीय टपाल विभाग आदींच्या व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!