Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Current News Updates Live : पोलीसांच्या विनंतीवरुन पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याच्या निर्णय घेतला मागे, कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन

Spread the love

ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. ईडी प्रकरणात नाव आल्यामुळे आता नोटीस आलेली नसताना शरद पवार स्वत: ईडी कार्यालयात जाणार आहेत. मात्र आता ईडीने पत्र पाठवत तुम्हाला तुर्तास चौकशीसाठी येण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी बॅकफूटवर गेली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई पोलीस शरद पवारांच्या घरी दाखल, मुंबई आयुक्त संजय बर्वे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने येत असून सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. मात्र याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

दरम्यान, तूर्तास कोणत्याही चौकशीची सध्या गरज नसल्याचा ईमेल ईडीकडून पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. परंतु शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

‘चौकशा मागे लावून विरोधी पक्ष संपवण्याचा सरकारचा डाव, लोकशाही धोक्यात’; ‘मनसे’चाही पवारांना पाठिंबा

शिवसेनेचे शरद पवारांना समर्थन : राजकारणातले पितामह भीष्म आहेत शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वत: आपण ईडी कार्यालयात जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना समर्थन दिलं आहे. शरद पवार राजकारणातले भिष्म पीतामह असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं

आहे की, “अख्ख्या महाराष्ट्रा

ला माहिती आहे की, ज्या बँक घोटाळ्यावरुन ईडीने एफआयआर दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते. तक्रारदाराने आपण कधीही शरद पवारांचं नाव घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. अण्णा हजारे यांनीदेखील त्यांना क्लीन चीट दिली आहे”.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “शरद पवार यांनी महाराष्ट्र आणि कृषी क्षेत्रात खूप काम केलं आहे. शरद पवार यांचा पक्ष आणि विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे. पण ईडीने त्यांच्यासोबत चुकीचं केलं आहे असंच मी म्हणेन. या घोटाळ्यावरुन विधानसभेत

चर्चा झाली होती तेव्हा त्यांचं नाव नव्हतं. ईडी आज देवापेक्षाही मोठी झालं आहे ? देव माफ करु शकतो, पण ईडी नाही”.

मुंबईत आणि मुंबईबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नेहमीच वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असणाऱ्या ठाणेकरांच्या त्रासात आज भर पडली असून तासनतास त्यांनी वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागत आहे.

ठाणे, दहिसर, वाशी टोलनाक्यावर पोलिसांनी बंदोबस्त लावला असून पाच मिनिटांचे अंतर कापायला जवळपास एक तास लागत आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस खबरदारी घेत असून याचा सर्वसामान्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पाहून अनेक लोकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. अनेक ठिकाणी पोलीस गाड्या अडवून तपासणी सुरू आहे. त्यामुळे कोंडीत वाढत आहे.

दरम्यान शरद पवार दुपारी दोनच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचतील. परंतु ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश

नाकारण्याची शक्यता सूत्रांनी व्य

क्त केली. तसंच खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

आजपासून विधानसभा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आजपासून म्हणजेच २७ सप्टेंबरपासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

शरद पवार जाणार मुंबई तल्या ईडीच्या कार्यालयात

‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

मुंबई: ठिकठिकाणी नाकाबंदी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

शरद पवारांच्या ईडी ऑफि

सच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अलर्ट, कलम १४४ लागू

मान्सूनचा परतीचा प्रवास लांबलणीवर…ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या परतीच्या प्रवासाला होणार सुरुवात, स्कायमेटचा अंदाज

पीएमसी खातेदारांना आता 1 हजार ऐवजी 10 हजार रूपये काढता येणार  आहेत. रिझर्व बॅंकेनं घातलेल्या निर्बंधांमध्ये बदल केला

जायकवाडी धरणात पाण्याचा फ्लो वाढतोय, मराठवाड्यात अलर्ट

जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर सोयगाव आणि जामनेर तालुक्यात कांग नदीवरील कांग धरणाची भिंती फुटण्याची स्थिती, हाय अलर्ट

ग्रामीण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा,

काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला जोधपूर कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. सलमान कोर्टात हजर न राहिल्यास त्याचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!