Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एकाच महिन्यात झाले पाच खून !!घरफोड्यातील आरोपींना मोक्का लावण्याच्या हालचाली, शहरातील परिस्थिती नियंत्रणात – निकेश खाटमोडे

Spread the love

जगदीश कस्तुरे । महानायक न्यूज अपडेट 

औरंगाबाद शहरात याच सप्टेंबर महिन्यात पाच खून झाले घरफोड्या सुरु आहेत तरीही परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी ‘महानायक’ शी बोलतांना केला आहे.

शहरात याच सप्टेंबर महिन्यात पाच खुनाचे गुन्हे मुकुंदवाडी,जवाहरनगर, बेगमपुरा, छावणी आणि सिडको औद्योगिक पोलिस ठाणे या पाचही पोलिस ठाण्यात खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत.शहरात खुनाच्या घटना होणे ही फार चांगली घटना नसतेच पण खुनाच्या गुन्ह्यात दोन प्रकारचे अॅंगल असतात. एक इन्सीडेंटल आणि दुसरा प्रोफेशनल वरील सहाही खुनाचे गुन्हे हे वैयक्तिक कारणातून घडून आल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.

या प्रकारामधे वैयक्तिक कारणे असल्यामुळे अशा घटनांना पायबंद घालणे शक्य नसते पण खून  घडल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करुन कोर्टासमोर हजर करणे हा एकच पर्याय पोलिसांसमोर उभा असतो. वरील पाच खून  प्रकरणात सर्व आरोपी अटक आहेत. केवळ बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल झालेला खुनाचा गुन्हा अद्याप उघडकीस येणे बाकी आहे.

यातील सुरवातीचा मुकुंदवाडीतील ११सप्टेंबर चा आरती गवळे खुनाचा गुन्ह्यातील तीनही आरोपी मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ अटक केले. तसेच जवाहर पोलिस ठाण्यात उद्योजक शैलेश राजपूत याच्या खून प्रकरणी त्याची पत्नी पूजा राजपूत ला जवाहरनगर पोलिसांनी तात्काळ अटक केली. त्यानंतर जयसिंगपुर्‍यातील १८ सप्टेंबर रोजी झालेल्या शेख शफीक शे.रफीक याच्या खुनाचा तपास पूर्ण झाला नसला तरी पूर्णत्वाकडे गेलेला असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

चौथा २४ सप्टेंबर रोजी सय्यद जमीर सय्यद जहीर याच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेने आरोपी सय्यद शाकेर,शेख दाउद आणि शहाजाद आली यांना ताबडतोब अटक केली.तर पाचव्या २५ सप्टेंबर रोजी घडलेल्या खून प्रकरणात आरोपी अमोल बोर्डेला एम.साडको पोलिसांनी अटक केली आहे. त्याने शेजारीच राहणारे दिनकर, त्यांची पत्नी कमल आणि मुलगा भगवान या बोर्डे कुटुंबियाचा एकाच वेळी खून केला.

कोणत्याही खुनाच्या घटनेचे समर्थन पोलिस करंत नाहीत.पण शहरात प्रोफेशनल खून घडंत नसल्याचेही खाटमोडे म्हणाले एखाद्याचा सुपारी देऊन काटा काढणे, किंवा राजकारंण घडंत असतांना झालेले खून या प्रकारचे खून हे तपासासाठी क्लिष्ट  असतात. यात आरोपी मोठं आव्हान पोलिसांसमोर उभे करतो.

अशा प्रकरणात पोलिस प्रशासनाला जनता, प्रशासन, सरकार कडक जाब विचारते. तसे प्रकार सध्या शहरात घडंत नसल्याचेही खाटमोडे म्हणाले. त्याच प्रमाणे घरफोड्या घडलेल्या प्रकरणांत अटक झालेल्या आरोपींना मोक्का लावता येतो का याचा सखोल अभ्यास करुन पुढील कारवाई केली जात आहे.कुठलाही गुन्हा घडल्यानंतर पोलिस त्याच समर्थन करंत नाही. पण प्रकरंण कशा प्रकारे घडले. त्या पध्दतीने ते हाताळावे लागते याचीही नागरिकांनी दखल घ्यावी एवढीच अपेक्षा शेवटी त्यांनी व्यक्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!