Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सातारा लोकसभा मतदार संघासाठी अखेर २१ ऑक्टोबरलाच पोटनिवडणूक तर मतमोजणी २४ ऑकटोबरलाच !!

Spread the love

अखेर राज्यातील राज्यातील सातारा लोकसभा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी पोटनिवडणूक   घेण्यात येणार असून २४ ऑक्टोबरला  मतमोजणी  होणार आहे. हि निवडणूक राज्याच्या  विधानसभा निवडणुकीबरोबरच जाहीर न झाल्याने या जागेचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले उदयनराजे कमालीचे नाराज झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघातील खासदार पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसोबतच ही निवडणूक पार पडणार आहे.

..असा असेल पोटनिवडणुकीचा कार्यक्रम!

सातारा लोकसभा मतदार संघासाठी 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान घेण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून  5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी  पार पडेल. 27 ऑक्टोबरला  पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!