Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शरद पवारांवर झालेल्या कारवाईशी सरकारचा संबंध नाही, आमचे सरकार येणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ , मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Spread the love

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान ” याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही.  त्यामुळे जाणीवपूर्वक कुणाला गुंतवण्याचा हेतू नाही. तसंच विधानसभा निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे.  ज्याला राजकारण कळतं त्याला हे कधीच वाटणार नाही की आम्ही हेतुपुरस्सर ही कारवाई केली  ” असाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ईडीने केलेली कारवाई ही पूर्णपणे त्यांची कारवाई आहे. ईडी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यावर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असं म्हणणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारने हेतूपुरस्सर किंवा राजकीय हेतूने प्रेरित ही कारवाई केलेली नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणी २३ सप्टेंबर रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारचा या कारवाईशी संबंध नाही असं आता मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई ईडीने केली आहे. या गुन्ह्यामध्ये ७० जणांची नावं आहे. १०० कोटी पेक्षा जास्त रकमेचा जेव्हा कोणताही गुन्हा असेल तेव्हा त्यासंदर्भातली दखल ही ईडीला घ्यावीच लागते. अशा प्रकरणांमध्ये ईडी वेगळा एफआयर करत नाही. ईडीने केलेल्या या कारवाईशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. राज्य सरकार सूडबुद्धीने वागतं आहे, जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली आहे, या प्रकारचे आरोप कालपासून होत आहेत त्याला काहीही अर्थ नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

‘बँक घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये सरकारचा काहीही संबंध नाही. सरकार सूडबुद्धीने अशा प्रकारची कारवाई करत नाही. महायुतीचा विधानसभा निवडणुकीत विजय होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. त्यामुळे ज्याला राजकारण कळतं ते सांगू शकेल की राज्य सरकार असं काही करणार नाही,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!