Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांच्या सभेला अनुपस्थित राहून उदयन राजेंनी पहिला दणका दिल्याची चर्चा रंगली !!

Spread the love

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपत गेलेले साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपाला आपला दणका  दाखवला असल्याची चर्चा आहे.  त्याचे कारण भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पश्चिम महाराष्ट्र मेळाव्याला उदयन राजे यांनी दुर्लक्षित केले आहे . नड्डा यांच्या उपस्थितीत या मेळाव्याला हर्षवर्धन पाटील, रणजित मोहिते पाटील आणि धनंजय महाडीक हजर असताना उदयनराजेंनी मात्र दांडी मारली. अर्थात रात्री उशिरापर्यंत त्यांनी याबाबत खुलासा केला नसल्याने नड्डा आणि इतर उपस्थितांच्या चर्चेपेक्षा उदयनराजेंच्या गैर हजेरीचीच चर्चा अधिक रंगली होती.

दरम्यान नाशिकमध्ये झालेल्या महा जनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच नाशिकमध्ये आले होते.या सभेच्या व्यासपीठावर उदयन राजे हे एका बाजुला उभे राहिल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. उदयन राजे यांना भाजपने त्यांची जागा दाखवली आहे. असे म्हणत राजेंचा भाजपने अपमान केल्याचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. उदयन राजे भोसले हे आपल्या हटके स्टाईल आणि बेधडकपणासाठी ओळखले जातात. राष्ट्रवादीत असताना त्यांनी अनेकवेळा पक्षनेतृत्वावरच जाहीररीत्या तोफ डागली होती. तसेच अनेकवेळा पक्षशिस्तीचा भंग केल्याचाही त्यांच्यावर आरोप झालेला आहे. भाजपच्या मेळाव्याला गैरहजर राहून उदयनराजेंनी भाजपला पहिला दणका दिल्याची चर्चा माध्यमामध्ये सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करूनही खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभेसोबत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. परंतु निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केली तेंव्हा सातारा लोकसभा मतदार संघ वगळून इतर राज्यातील पोटनिवणूका जाहीर केल्याने उदयनराजे भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!