Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आंबेडकरनगर चौकात अपघात, एक ठार, २ गंभीर जखमी, दोन अपघाता नंतर संतप्त जमावाने केली दगडफेक

Spread the love

घटनास्थळी मोठा फौजफाटा दाखल

आंबेडकर नगर चौकातून भरधाव जाणा-या खासगी बसने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला तर दुचाकीस्वार दांम्पत्य गंभीर जखमी झाले. हे दोन्ही अपघात सोमवारी (दि.२३) दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडले. दरम्यान, आंबेडकरनगर चौकात तासाभराच्या अंतराने एका पाठोपाठ झालेल्या दोन अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी दगडफेक करून खासगी बसच्या काचा फोडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसारवाडी परिसरातील गल्ली नंबर १० येथे राहणारे मोहम्मद सिद्दीक लियाकत अली शेख (वय ६५) हे दुपारी ४ वाजेच्या सुमारास आंबेडकर नगर चौकातून जात होते. त्यावेळी कंपनी  कामगारांची वाहतूक करणा-या खासगी बसने मोहम्मद सिद्दीक शेख यांना धडक दिली. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहम्मद सिद्दीक शेख यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. हा अपघात होवून तासभर उलटत नाही तोच हर्सुल टी पॉईन्ट चौकातून सिडको बसस्थानकाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या खासगी बसने दुचाकीस्वार दांम्पत्यास धडक दिली. अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या दांम्पत्याच्या पायावरून बसचे चाक गेल्याने दुचाकीस्वार दांम्पत्य गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या दांम्पत्याला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले.

एका पाठोपाठ एक असे दोन अपघात झाल्यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकर नगर येथील रहिवाश्यांनी कंपनी  कामगारांची वाहतूक करणा-या खासगी बसेसवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच सिडको विभागाचे सहाय्यक आयुक्त गुणाजी सावंत, सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांच्यासह दंगा नियंत्रक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करीत दगडपेâक करणा-यांना हुसकावून  दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!