Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बनावट कागदपत्राआधारे पंधरा टँकरची परस्पर विल्हेवाट, तत्कालीन परिवहन अधिका-यांसह पाच जणांविरुध्द गुन्हा

Spread the love

औरंंंगाबाद : शासनाने भेसळीच्या कारणामुळे बंद केलेले टँकर पेट्रोल पंपासमोरील जागेवर उभे असताना तत्कालीन परिवहन अधिकारी आणि निरीक्षकाच्या मदतीने नातेवाईकानेच पंधरा टँकरची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला आहे. यात अनिल जगन्नाथ राणा, काकासाहेब शिंदे (बाबासाहेब शिंदे), मोहंमद सलीम अब्दुल गफार, तत्कालीन परिवहन अधिकारी आणि निरीक्षकाचा समावेश आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राधाकिसन राणा (वय ६५, रा. राणानगर) यांचा नातेवाईक अनिल राणा याच्यासह आठ सदस्यांचे एम. एस. राणा साहेबलाल मन्नुलाल नावाने फर्म होते. या फर्मच्या नावे काही जंगम मालमत्ता आणि रॉकेल, पेट्रोल वाहण्यासाठी पंधरा टँकर होते. या टँकर्सच्या माध्यमातून पेट्रोलियम उत्पादने व रॉकेलचा विविध भागात पुरवठा केला जात होता. हा व्यवसाय भागीदारीमध्ये अटी व शर्तीनुसार सुरू होता. मात्र, २००८ मध्ये शासनाने भेसळीच्या कारणामुळे व शासनाने कोटा कमी केल्यामुळे कंपनीने बंद केले होते. त्यानंतर हे पंधरा टँकर्स शरणापुर फाटा येथील एचपी पेट्रोलपंपासमोरील जागेत उभे करण्यात आले होते. पण त्यानंतर हे टँकर अनिल राणा, काकासाहेब शिंदे आणि मोहंमद सलीम यांनी तत्कालीन परिवहन अधिकारी व परिवहन निरीक्षकाच्या मदतीने खोट्या कागदपत्राआधारे विक्री केले.

हा प्रकार संजय राणा यांच्या निदर्शनास आल्यावरुन त्यांनी फसवणुक केल्याप्रकरणी पाचही जणांविरुध्द न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने संजय राणा यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यावरुन दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास निरीक्षक राजश्री आडे या करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!