Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : भाजप -सेनेच्या नेत्यांना येत्या दोन दिवसात महायुतीची अपेक्षा

Spread the love

राज्यात भाजप – सेनेची युती होईल कि नाही अशी चर्चा चालू असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी  येत एक दोन दिवसात युती होणार असून महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात शिवसेनेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात युतीची दिवाळी साजरी होईल, असे म्हटले आहे.

याशिवाय महाराष्ट्रात भाजपा सरकार येत्या काही दिवसांमध्ये आपण काय केलं आणि आपण काय करणार आहोत हे ८.९४  कोटी लोकांपर्यंत पोहोचू. आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू. आम्ही २२० पारचं लक्ष्य ठेवून आहोत. विरोधकांनी शस्त्र  टाकलंय. हा आकडा पुढे जाईल. जनतेचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू असा विश्वास असल्याचं विनोद तावडे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीचे निकाल २४  ऑक्टोबर (गुरूवार) रोजी जाहीर होणार असून दिवाळीपूर्वी नवे  सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात १.८ लाख इव्हिएमचा वापर होणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण ८.९४  कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दरम्यान युती झाली तरी  बंडखोरीची शक्यता नाही. भजाप- शिवसेनेचे  संघटनात्मक नेटवर्क मोठे  आहे. त्यामुळे नाराज होतील. पण त्यांना संमजावण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकतो. उदयनराजे  हे भाजपात आले आहेत. ते नक्कीच भाजापाच्या विजयासाठी प्रयत्न करतील. साताऱ्याची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नसली तरी त्यातही भाजपाच विजयही होईल असा विश्वास असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!