Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रातील सातारा वगळता देशातील ६४ जागांवर होणार पोटनिवडणूक

Spread the love

केंद्रीय निवडणूक आयोगाने  महाराष्ट्र विधानसभा, हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ जागेवरील पोटनिवडणूकीच्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्रामधील साताऱ्यातील पोटनिवडणुकीचा समावेश नाही. साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात दाखल होतं आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये अरुणाचल, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल, कर्नाटक, केरळ , मध्यप्रदेश, मेघालय , ओडिसा ,पॉण्डचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगणा, आणि उत्तर प्रदेश या राज्यातील पोटनिवडणुकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. दरम्यान साताऱ्याची पोटनिवडणूक मात्र आता लांबणीवर गेली आहे. साताऱ्याची पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत जाहीर करण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात दोन्हीही निवडणूका एकत्र होतील असे म्हटले होते पण तसे झाले नाही.

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि राष्ट्रवादीकडून तयारी सुरू झाली आहे. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादीकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच लढत होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!