Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विद्यार्थीनीवरील बलात्कार प्रकरणात चिन्मयानंदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love

माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चिन्मयानंद यांना शाहजहांपूर तुरुंगात ठेवण्याचे आदेश स्थानिक न्यायालयानं दिले आहेत.

एसआयटी आज त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजार केले होते .  चिन्मयानंद यांचे  शहाजहांपूर येथे लॉ कॉलेज आहे. याच कॉलेजातील एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा व तिचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप चिन्मयानंद यांच्यावर आहे. हा आरोप झाल्यानंतर उत्तर प्रदेशात मोठा राजकीय गदारोळ झाला होता.

चिन्मयानंद निर्दोष असल्याचं सांगत त्यांचे पाठीराखे रस्त्यावर उतरले होते. मात्र, पीडित विद्यार्थिनीनंही माघार न घेता या संदर्भातले अनेक व्हिडिओ जाहीर केले होते. त्यानंतर चिन्मयानंद यांना अटक करण्याच्या मागणीनं जोर धरला होता. चिन्मयानंद यांना अटक न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी पीडित मुलीनं दिली होती. हे प्रकरण चिघळणार असं दिसताच चक्रे फिरली आणि आज अखरे अटकेची कारवाई झाली. अटकेनंतर आज लगेचच त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयानं त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान चिन्मयानंद यांना अटक करण्यात दिरंगाई झाल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी फेटाळला आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. चौकशीनंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कुठलीही दिरंगाई झालेली नाही,’ असं सिंह म्हणाले. चिन्मयानंद यांना ब्लॅकमेल करणाऱ्या तीन पोलिसांनाही अटक करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!