Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mob Lynching : अखेर तबरेज अन्सारी खून प्रकरणात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

वैद्यकीय सूत्रांनी सादर केलेल्या ताज्या अहवालानुसार तबरेजच्या मृतदेहाच्या अभ्यासातून काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. टणक आणि बोथट वस्तूमुळे मारहाण झाल्यामुळे त्याची हाडे मोडली होती. हाडे मोडणे, मूळचेच अशक्त शरीर आणि हृदयातील कप्प्यांत रक्त भरणे यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला असे नमूद करण्यात आल्या नंतर दोषी संशयितांविरुद्ध पोलिसांना पुन्हा कारवाई करावी लागली. या प्रकरणात खुण्यंना अटक झाली नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा तबरेजच्या पत्नीने दिला होता.

मॉबलिंचिंगचा बाली ठरलेल्या  तबरेज खान याच्या ११ मारेकऱ्यांविरोधात पोलिसांनी ताज्या वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारे पुन्हा नव्याने खुनाचा  गुन्हा दाखल केला आहे.  विशेष म्हणजे आठच दिवसांपूर्वी या मारेकऱ्यांना पुराव्याअभावी सोडण्यात आले होते.

पोलिसांनी खारसावन जिल्ह्यातील सराईकेला येथील न्यायाालयात या ११ जणांविरोधात भारतीय दंड संहितेतील कलम ३०२ अन्वये पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणातील उर्वरित दोन आरोपींविरोधातही पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे आरोपींची एकूण संख्या १३ झाली आहे.

तबरेज अन्सारी (वय २४) पुण्यात मजुरी करीत होता. ईद साजरी करण्यासाठी तो गावी गेला होता. चोरी केल्याच्या संशयावरून जमावाने पकडले आणि नंतर त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडीत त्याला मरेपर्यंत मारहाण करण्यात आली होती. जमशेदपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आधीच्या वैद्यकीय अहवालात तबरेजचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटले होते. मात्र, त्याचे कारण स्पष्ट केलेले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी जमशेदपूरमधील एमजीएम मेडिकल कॉलेजच्या विशेषज्ज्ञ डॉक्टरांकडून पुन्हा वैद्यकीय तपासणी करवून घेतली होती.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!