मनमोहन सिंग हे जेवढे मृदू आहेत तेव्हढेच ते कठोरही होवू शकतात, ते पाकिस्तानवर लष्करी कारवाईच्या विचारात होते : डेव्हिड कॅमरून

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईवर झालेला २६/११ सारखा हल्ला जर पुन्हा झाला असता तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग   हे पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याच्या विचारात होते असं कॅमरून यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी हा मोठा गोप्यस्फोट केल्याने अबोल असणारे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा एक वेगळं पैलू भारतीयांसमोर आला आहे.  कॅमरून यांचं आत्मचरित्र ‘For the Record’  नुकतच प्रसिद्ध झालंय त्यात हा गौप्यस्फोट करण्यात आला असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. स्वतः मनमोहनसिंग यांनी किंवा काँग्रेसने हि गोष्ट कधीही सांगितली नाही हे विशेष.

Advertisements

डेव्हिड कॅमरून हे २०१० ते २०१६ या काळात ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्याकाळात त्यांनी दोनवेळा भारतला भेटही दिली होती आणि जगातल्या विविध व्यासपीठांवर ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटलेही होते. त्यांच्याशी झालेल्या संवादावरून त्यांनी हे मत व्यक्त केलंय. त्याचबरोबर मनमोहन सिंग यांच्या अनेक आठवणीही त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. कॅमरून यांनी मनमोहन सिंग यांचा उल्लेख अतिशय सभ्य असा संत माणून म्हणून केलाय. मनमोहन सिंग हे जेवढे मृदू आहेत तेव्हढेच ते कठोरही होवू शकतात असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

Advertisements
Advertisements

दरम्यान भारतीय वंशाच्या माणसांनी ब्रिटनच्या सर्वच क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलीय. या माणसांच्या योगदानामुळे ब्रिटनच्या वैभवात मोठी भर पडल्याचंही त्यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे.  काश्मीरमधून ३७० वं कलम हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर  कॅमरुन यांच्या या नोंदीला विशेष महत्व आले आहे.

आपलं सरकार