मित्रांसोबत फिरायला आलेल्या जालना जिल्ह्यातील पर्यटकाचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

भीमाशंकर , भोरगिरी येथील भोरगडाच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्याच्या पाण्यात बुडून एका पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिक व पोलीस पाटील यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात असल्याचे वृत्त आहे.

Advertisements

भोरगिरी येथे फिरायला आलेल्या सोमनाथ विठ्ठल तांगडे (वय-23, रा.वडोद तांगडे, ता.भोकरदंन , जि.जालना) या तरुणाचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे वृत्त आयबीएन१८ ने दिले आहे. सोमनाथ हा तरुण आपल्या मित्रांसमवेत आला होता. बुधवार सकाळपासून हे सर्व पर्यटक भोरगड, कोटेश्वर अशा सर्व परीसरात फिरुन आल्यानंतर सोमनाथ हा भोरगडाच्या पायथ्याला असणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात उतरला होता. खडक निसरडा  असल्याने सोमनाथचा पाय घसरुन तो पाण्यात पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Advertisements
Advertisements

आयबीएन१८ ने दिलेल्या वृत्तानुसार भीमाशंकर व भोरगिरी परिसरात निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात. मात्र, आनंदाच्या भरात धोकादायक ठिकाणाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहे. त्यामुळे या परिसरात आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर कुठल्याही सुविधा उपलब्ध होत नाही.

भीमाशंकर व भोरगिरी परिसर पर्यटनासाठी पर्यटकांना भुरळ घालतात, असे असताना एकीकडे पर्यटन वाढत आहे. मात्र या पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांना आपात्कालीन वेळी या परिसरात कुठल्याही सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

आपलं सरकार