Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अचानक खात्यात आलेल्या ४० लाखात आधी केली मौज मजा आणि नंतर त्याला झालाय तीन वर्षाची ” सजा ” !!

Spread the love

अचानक त्यांच्या बँकेच्या खात्यात तोडे तितके नाही तब्ब्ल ४० लाख रुपये जमा झाले आणि त्यांनीही कुणाला याची खबर न देता खूप मौज मजा केली आणि आठ महिन्यांनंतर कळले कि ते त्यांचे पसे नव्हतेच. दरम्यान बँकेच्या विनंती नंतरही या दाम्पत्याने खर्च केलेली रक्कम जमा करण्यास नकार दिला आणि मौज -मजेचे रूपांतर शेवटी तिन वर्षाच्या ” सजेत ” झाले असल्याचा अजब किस्सा घडला आहे.

त्याचे असे झाले कि , तामिळनाडूमधील तिरुपूर येथील व्ही. गुनशेखरन यांच्या बँक खात्यात २०१२ ला  अचानक एक दिवशी ४० लाख रुपये आले खरे मात्र गुनशेखर यांना  सुद्धा  हे पैसे खात्यात कोठून आले याची चौकशी करणे जरुरी वाटले नाही. त्या पैशांतून त्यांनी संपत्ती खरेदी केली, मुलीचे लग्न देखील करून दिले. त्यानंतर अचानक आलेलय  पैशांची चौकशी न करणे त्यांना असे काही महागात पडले की गुनशेखर आणि त्यांची पत्नी राधा यांची कोईम्बतूर रवानगी तुरुंगात झाली. सोमवारी येथील एका कोर्टाने त्यांना ३ वर्षाची शिक्षा सुनावली.

नेमके काय झाले ? 

तामिळनाडूच्या खासदार आणि आमदार निधीतून सार्वजनिक बांधकाम  विभागाला हि रक्कम दिली जाणार होती.  पण अधिकाऱ्यांच्या  चुकीमुळे सदरील रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट सरकारी खात्यात जाण्याऐवजी गुनशेखरन यांच्या बँक खात्यात जमा झाले. ही दोन्ही खाती तिरुपूरमधील कॉर्पोरेशन बँकेत होती. पैसे चुकीच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर तब्बल ८ महिन्यांनी अधिकाऱ्यांना अद्याप पैसे जमा  का झाले नाहीत ? याची बँकेत चौकशी केली. तेव्हा डिमांड ड्राफ्टवर जो बँक नंबर लिहला आहे तो चुकीचा असल्याचे लक्षात आले.

दरम्यान  बँकेने जेव्हा गुनशेखरन यांचे खाते तपासले तेव्हा त्यांनी ते सर्व पैसे खर्च केल्याचे लक्षात आले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी गुनशेखर यांना पैसे परत करण्याची विनंती केली. पण त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर २०१५ मध्ये बँकेने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुनशेखरन आणि त्यांच्या पत्नीवर कलम ४०३ आणि कलम १२० बी अन्वये गुन्हा चालवण्यात आला. न्यायालयाने सरकारी पक्ष आणि गुनशेखरन यांची बाजू ऐकल्यानंतर सोमवारी निकाल दिली. न्यायालयाने गुनशेखरन यांना ३ वर्षाची शिक्षा सुनावली आणि आयत्या आलेल्या पैशावर मौज मजा करून मोकळे झालेल्या गुनशेखरनला तुरुंगात जावे लागले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!