Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Prakash Ambedkar : ‘एमआयएम’ने युती तोडणे हा लोकसभेनंतरचा खा. जलील यांचा सुज्ञपणा, आघाडीसाठी आमचे दरवाजे कायमचे खुले

Spread the love

वंचितला भाजपची ‘बी’ टिम म्हणणारे काँग्रेसवाले भाजपचे गुलाम , चौकशी आणि केसेस टाळण्यासाठी भाजपात सहभागी होत असल्याचा आरोप


वंचित बहुजन आघाडीची मुख्य लढाई भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गिनती करत नाही. बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेसवाले हे भाजपचे गुलाम असून त्यांच्या इशाऱ्यावर ते चालतात. ही मंडळी चौकशी आणि केसेस टाळण्यासाठी भाजपात सहभागी होत आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात बोलताना केली. दरम्यान एम आय एम च्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले खा. इम्तियाज जलील यांनी लोकसभा जिंकल्यानंतर युती तोडण्याचा सुज्ञपणा त्यांना आला. विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू असताना एमआयएमने आघाडी तोडण्याचे काम केले. मात्र, आघाडीसाठी आमचे दरवाजे कायमचे खुले आहेत.


वंचित बहजन आघाडीची ‘सत्ता संपादन रॅली’बुधवारी कोल्हापुरात दाखल झाली. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिन्स हॅक न झाल्यास वंचित बहुजन आघाडी सत्तेवर येऊ शकते, असा विश्वासही व्यक्त केला. आपण विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचेही स्पष्ट केले.

यावेळी बोलताना आंबेडकर पुढे म्हणाले की, सगळे पक्ष सत्तेसाठी सरसावले आहेत, पण सत्ता का, हवी याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. ‘वंचित’ मात्र निश्चित कार्यक्रम घेऊन निवडणूक लढवित आहे. वंचित आघाडीची झेप सत्ता संपादनासाठी आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागा लढविणार आहे. यापूर्वी काँग्रेसला राज्यात निम्म्या निम्म्या जागेचा प्रस्ताव दिला होता. आता मात्र त्यांच्याशी आघाडीसोबत चर्चा करणार नाही. त्यांच्याशी आघाडी करून वंचितचे आम्हाला सँडवीच, फुटबॉल होऊ द्यायचे नाही. राज्यातील लहानसहान पक्षांना सोबत घेऊन सगळ्या जागा लढवू आणि सत्ता संपादन करू. पहिली यादी येत्या आठ दिवसांत जाहीर होईल. पहिल्या टप्प्यात ओबीसी, त्यानंतर मुस्लिम उमेदवारांची यादी जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या आघाडी तोडण्याच्या टीकेवर आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना सूज्ञपणा आला, चांगली गोष्ट आहे, असा टोला लगाविला. ते म्हणाले की, विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू असताना एमआयएमने आघाडी तोडण्याचे काम केले. मात्र, आघाडीसाठी आमचे दरवाजे कायमचे खुले आहेत. एमआयएम सोबत नसल्यामुळे मुस्लिम मते दुरावणार नाहीत. कारण भाजपला पराभूत करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये उरली नाही. वंचित बहुजन आघाडीच भाजपला रोखू शकतो याची जाणीव मुस्लिम मतदारांना आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!