लज्जास्पद : स्वतःच्या पत्नीवर मित्रांना लैंगिक अत्याचार करणारा विकृत नवरा पोलिसांच्या रडारवर

Advertisements
Advertisements
Spread the love

बायकांची अदलाबदल करून मित्रांसोबत शारिरीक संबंधांसाठी नकार दिल्यामुले  रागावलेल्या  विकृत पतीने स्वतःच्या पत्नीवर मित्रांकडून लैंगिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि लज्जास्पद घटना दिल्लीत घडली आहे. नराधम पतीने एवढ्यावरच न थांबता दुष्कृत्याचा व्हिडिओदेखील बनवला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्रांनाही पत्नीवर बलात्कार करायला सांगितल्याचा हा लज्जास्पद  प्रकार समोर आला आहे.

Advertisements

दिल्ली  पोलिसांनी या प्रकरणात दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत राहणाऱ्या पीडित महिलेनं या घटनेची माहिती स्वतःहून पोलिसांना दिली. तिनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पती दारूच्या आहारी गेला आहे. त्याच्याकडून वारंवार त्याच्या मित्रांसोबत बायकांची अदलाबदल करून मित्रांसोबत शारिरीक संबंधांसाठी दबाव टाकला जात होता. तू जर होकार दिलास तर मला माझ्या मित्रांच्या पत्नीसोबत संबंध ठेवता येतील असंही पतीकडून सांगिलतं जायचं असा आरोप पत्नीनं केला आहे.

Advertisements
Advertisements

सातत्यानं पतीकडून याबद्दल दबाव आणला जात होता. तरीही त्याच्या मागण्यांना तिने दाद दिली नाही. तसेच मी यासाठी कधीच तयार होणार नाही असं पतीला स्पष्ट सांगितलं. यावरून पती-पत्नीमध्ये वाद व्हायचा. दारूच्या नशेत पतीकडून तिला मारहाण व्हायची. एक दिवस पतीने दारूच्या नशेत पुन्हा ‘वाईफ स्वापिंग’साठी वाद घातला. तेव्हा पत्नीने स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतर पतीने मारहाण केली. तसेच तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग केलं. त्यानंतर जर तू तयार झाली नाहीस तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

पत्नीच्या तक्रारी नुसार तिला एका खोलीत कोंडून पतीने त्याच्या मित्रांना खोलीमध्ये पाठवलं. त्यानंतर दोन्ही मित्रांनी पत्नीवर बलात्कार केला. त्यांनी तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. पीडित महिलेच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. महिलेनं या प्रकारानंतर पती आणि त्याच्या दोन मित्रांनी बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आपलं सरकार