Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : संभाजी ब्रिगेडकडून १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Spread the love

गेले २५  वर्षे दुसऱ्यांसाठी लढलो, आता स्वतःसाठी जिंकण्याकरीता निवडणुका लढणार आहोत, असे सांगत ‘संभाजी ब्रिगेड’ने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी आपली १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी ब्रिगेडने १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. सर्व जागांवर ते आपले उमेदवार उभे करणार आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संभाजी ब्रिगेडच्या संसदीय समितीची 15 सप्टेंबरला प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद येथील कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी उमेदवारांच्या दुसऱ्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.

‘संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई मशीन अधिकृत चिन्ह मिळाले आहे. आमचा राजकीय अजेंडा ठरलेला आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक लढवणार आहे,’ अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!